सातारा जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर निर्मिती

जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. १५ कारखान्यांकडून ९८ लाख ८५ हजार ६११ टन उसाचे गाळप झाले. त्यातून एक कोटी ११ लाख २९ हजार ६३० क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.
One crore quintal sugar production in Satara district
One crore quintal sugar production in Satara district

सातारा ः जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. १५ कारखान्यांकडून ९८ लाख ८५ हजार ६११ टन उसाचे गाळप झाले. त्यातून एक कोटी ११ लाख २९ हजार ६३० क्विंटल साखरनिर्मिती झाली असून, सरासरी ११.२६ टक्के उतारा मिळाला आहे. सह्याद्रीने साखर उताऱ्यात, तर जरंडेश्‍वर कारखान्याने गाळप व साखरनिर्मितीत आघाडी ठेवली आहे.

आठ सहकारी व सात खासगी कारखान्यांनी ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी कारखान्यांची संख्या वाढली आहे. अजिंक्यतारा कारखान्यांचा अपवाद वगळता एप्रिलअखेर कारखान्यांचा हंगामाची सांगता झाली होती. जरंडेश्‍वर कारखान्याने १४ लाख १९ हजार ६६० टन इतके सर्वाधिक गाळप केले असून, १६ लाख २७ हजार ७७५ क्विंटल साखरनिर्मिती जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यास सह्याद्री कारखान्याची आघाडी असून, सरासरी १२.६७ टक्के घेतली. अजिंक्‍यतारा कारखान्यांकडे तोडणी, वाहतूक यंत्रणा सुरळीत असल्याने हा कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक दिवस कारखाना सुरू ठेवला आहे.

खासगी कारखानेही आघाडीवर या हंगामात खासगी कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठ्या प्रमाणात गाळप केले. या सात खासगी कारखान्यांनी ५१ लाख २५ हजार ७७८ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ५४ लाख ५६ हजार ३५५ क्विंटल साखरनिर्मिती केली. तर सहकारी कारखान्यांनी ४७ लाख ५९ हजार ८३३ टन उसाचे गाळप करत ५६ लाख ७३ हजार २७५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

गळीत हंगाम दृष्टिक्षेपात

  • सह्याद्री कारखान्यांचा सर्वाधिक १२.६७ टक्के  साखर उतारा
  • अजिंक्‍यतारा कारखान्यांकडून सर्वाधिक दिवस गाळप
  • सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.९२ टक्के साखर उतारा
  • जरंडेश्‍वर कारखान्याला सर्वाधिक गाळप व साखरनिर्मिती  
  • खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप
  • निवडणुकांमुळे कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य  
  • चार हंगामापैकी गत हंगामाचा अपवाद वगळता तीन हंगाम एक कोटी क्विंटलवर साखरनिर्मिती
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com