माफसूच्या प्राध्यापकांची एक दिवसाची सामुहिक रजा

उदगीर, जि. लातूर : पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्र आणि उपकेंद्र आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व समकक्षांनी बुधवारी (ता.११ ) एक दिवसाची सामुहिक रजा घेतली.
 One day collective leave of professors
One day collective leave of professors

उदगीर, जि. लातूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत सर्व पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्र आणि उपकेंद्र आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व समकक्षांनी बुधवारी (ता.११ ) एक दिवसाची सामुहिक रजा घेतली. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन आता प्राध्यापकांनी तीव्र केले आहे. 

‘माफसू’ हे बहुतांश देशातील एकमेव असे विद्यापीठ आहे, की जेथे सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक अशी धोरणात्मक पदोन्नती नाही. प्रशासन सहयोगी प्राध्यापकांच्या रिक्त जागा सरळ सेवेने भरण्यास अनुत्सुक आहे. अशा धोरणात्मक चुकांमुळेच आजमितीस विद्यापीठातील सर्व आस्थापनामिळून सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांची एकूण संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सहायक प्राध्यापकांची पात्रता असून सुद्धा पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत.  

सहायक प्राध्यापकांना कालबद्ध पदोन्नतीसोबत सहाव्या वेतन आयोगाचे वेतनवाढीचा फरक, उच्च शिक्षणाचे दोन वेतन अंशदान, पगारातून वर्षानुवर्षे कपात केलेली डी.सी.पी.एस. आणि एन.पी.एस.रक्कम खात्यात जमा न करणे, बदली धोरण, एपीआय, सातवा वेतन आयोग हे वैधानिक लाभ सुद्धा आजतागायत अप्राप्त आहे. 

राज्यपाल तथा कुलपती आणि मंत्री तथा प्रति कुलपतींनी विद्यापीठ प्रशासनातील औदासिन्य दूर करण्यासाठी हस्तक्षेप करावा. वर्षांनुवर्षे दुर्लक्षित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे. सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक ही कालबद्ध पदोन्नती आणि सहयोगी प्राध्यापक पदभरती यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही व्हावी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार प्राध्यापक संघटनेने केला.

मागणी वर कार्यवाही न झाल्यास दैनंदिन आभासी कामावर आणि ३ डिसेंबर रोजी विद्यापीठ वर्धापन दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही प्राध्यापकांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com