सरकारचे दुर्लक्ष : चारा छावण्यात जनावरांसह शेतकऱ्यांचा अन्नत्याग

अन्यत्याग आंदोलन
अन्यत्याग आंदोलन

नगर : दुष्काळाची दाहकता अधिक वाढत असताना जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू करण्याला प्रशासन मात्र उशीर करत आहे. त्यामुळे सोमवारी पाथर्डी तालुक्‍यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यात जनावरांसह शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.   सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला. जनावरे जगवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्याने छावण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. आता प्रस्ताव मागवत आहेत. मात्र छावण्या लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्नच केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. प्रशसानाची चाल पाहता अजून किमान पंधरा दिवस छावण्या मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जेथे गरज आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.   प्रशासनाकडून छावण्या सुरू करण्याबाबत उशीर केला जात असल्याने सोमवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत पाथर्डी तालुक्‍यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यांत जनावरांसह शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारची शेतकऱ्याबाबत भूमिका चांगली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. जनावरे जगवण्यासाठी शासन काहीही करत नसल्याने आम्ही निषेध करत आहोत, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com