agriculture news in Marathi, one day fast in Nagar, Maharashtra | Agrowon

सरकारचे दुर्लक्ष : चारा छावण्यात जनावरांसह शेतकऱ्यांचा अन्नत्याग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नगर : दुष्काळाची दाहकता अधिक वाढत असताना जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू करण्याला प्रशासन मात्र उशीर करत आहे. त्यामुळे सोमवारी पाथर्डी तालुक्‍यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यात जनावरांसह शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. 

नगर : दुष्काळाची दाहकता अधिक वाढत असताना जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू करण्याला प्रशासन मात्र उशीर करत आहे. त्यामुळे सोमवारी पाथर्डी तालुक्‍यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यात जनावरांसह शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. 

सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला. जनावरे जगवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्याने छावण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. आता प्रस्ताव मागवत आहेत. मात्र छावण्या लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्नच केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. प्रशसानाची चाल पाहता अजून किमान पंधरा दिवस छावण्या मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जेथे गरज आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
 
प्रशासनाकडून छावण्या सुरू करण्याबाबत उशीर केला जात असल्याने सोमवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत पाथर्डी तालुक्‍यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यांत जनावरांसह शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्नत्याग करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारची शेतकऱ्याबाबत भूमिका चांगली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. जनावरे जगवण्यासाठी शासन काहीही करत नसल्याने आम्ही निषेध करत आहोत, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 


इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...