उपोषण करणाऱ्या एका मुलीची प्रकृती खालावली

शेतकरी कन्यांचे उपोषण
शेतकरी कन्यांचे उपोषण

पुणतांबा, जि. नगर  ः शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुणतांबा (जि. नगर) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन गुरुवारी (ता. ७) चौथ्या दिवशीही सुरूच होते. गुरुवारी शुंभागी संजय जाधव या मुलीची प्रकृती खालावली होती.  सरकार दखल घेत नसल्याने नागरिकांनी गावात भीक मागून जमा झालेल्या ४६४ रुपयांची मुख्यमंत्र्यांनी मनीऑर्डर केली आहे.शेतकऱ्यांची लेकरं चार दिवसांपासून आंदोलन करत असताना प्रशासनाने मात्र अजूनही फारसी दखल घेतलेली नाही. गुरुवारी शुंभागी संजय जाधव या मुलीची प्रकृती खालावली आहे. मात्र तिच्यावर अन्य ठिकाणी उपचार करण्याला अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलींसह गावकऱ्यांनी नकार दिला.  गतवर्षी राज्यात शेतकरी संपाचे रमशिंग पुणतांबा (जि. नगर) येथून फुंकले गेले. त्यानंतर सरकारने भरभरून अश्‍वासने दिली गेली, मात्र त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या निकिता जाधव, पूनम जाधव व शुभागी जाधव या तीन शेतकऱ्यांच्या मुलींपैकी गुरुवारी शुंभागी संजय जाधव हिची प्रकृती खालावली आहे. डॉक्‍टरांनी तपासणी करून तालुका प्रशासनाला अहवाल दिला. त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर व पोलिस निरिक्षक अरुण परदेशी आंदोलन स्थळी आले. त्यांनी शुभांगीवर उपचार करायचे असल्याचे सांगितले. मात्र आंदोलन करत असलेल्या अन्य मुलींसह गावकऱ्यांनी अन्य ठिकाणी उपचार करण्याला नकार दिला.  शेतकऱ्यांची लेकरं आंदोलन करत असताना सरकार दखल घेत नसल्याने गुरुवारी गावकऱ्यांनी सरकारसाठी भीक मागितली व त्यातून जमा झालेल्या ४६४ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केली आहे.  दरम्यान, आंदोलनस्थळी गावकऱ्यांनी ठाण मांडलेले आहे. राजकीय नेते आणि परिसरातील शेतकरी, नागरिकही आंदोलनाला भेट देत आहेत. सरकारबद्दल लोकांत संताप व्यक्त केला जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com