Agriculture news in marathi, One hundred quintals of onion theft in Kusumba | Agrowon

कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून लंपास

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष शिंदे यांचा चाळीत साठविलेला शंभर क्विंटल कांदा चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष शिंदे यांचा चाळीत साठविलेला शंभर क्विंटल कांदा चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातील चाळीत सुमारे १५० क्विंटल कांदा पाच महिन्यांपासून साठवून ठेवला होता. गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा काढण्यास सुरवात केली. मागील आठवड्यात १५ क्विंटल कांदा त्यांनी विकला. चाळीत १३५ क्विंटल कांदा होता. मात्र चोरट्यांनी त्यातून शंभर क्विंटल कांदा मोठ्या गाडीत भरून लंपास केला. ही घटना बाजूचे शेतकरी प्रफुल्ल शिंदे सकाळी शेतात आल्यावर त्यांना समजली. मोठ्या गाडीचे टायर गाऱ्यात उमटलेले व चाळीत कांदा विखुरल्यासारखे दिसले. त्यांनी सुभाष शिंदे व हर्षल शिंदे यांना भ्रमणध्वनीने कळविले. 

परिसरात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब असल्याने कांदा खराब झाला. मात्र मी चार हजार रुपयांच्या उच्च प्रतीच्या बियाण्यापासून रोपे तयार करून कांदालागवड केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून कांदा चाळीत जशाच तसा टिकून होता. काही दिवसांपूर्वी भाव कमी होते, मात्र आता भाव वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी काढत होतो. अशातच चोरट्यांनी शंभर क्विंटल कांद्यावर हात साफ केला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास नेला आहे. 
- सुभाष शिंदे, शेतकरी, कुसुंबा (जि.धुळे)


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...