agriculture news in marathi, one hundred sixty nine candidates filled forms for assembly election, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून १६९ उमेदवारांचे अर्ज दाखल

टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सातारा  : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून अंतिम मुदतीत एकूण १६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान, माण मतदारसंघात भाजपमधून जयकुमार गोरे; तसेच शिवसेनेतून शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथे युतीचा धर्म पाळला जाणार की निवडणूक लढवली जाणार हे पहावे लागणार आहे. 

सातारा  : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून अंतिम मुदतीत एकूण १६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान, माण मतदारसंघात भाजपमधून जयकुमार गोरे; तसेच शिवसेनेतून शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथे युतीचा धर्म पाळला जाणार की निवडणूक लढवली जाणार हे पहावे लागणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत दिग्गज राजकारण्यांसह सामान्यांनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत १६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अऩेक मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. माण मतदारसंघात भाजपमधून जयकुमार गोरे; तसेच शिवसेनेतून शेखर गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथे युतीचा धर्म पाळला जाणार की निवडणूक लढवली जाणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. इच्छुकांची संख्या वाढली असल्याने अर्जांची संख्या वाढली आहेत. एकूण अर्जांमध्ये अनेक उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र बहुतांशी मतदारसंघांत किमान तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय दाखल अर्ज ः फलटण २१, वाई २४, कोरेगाव १६, माण २५, कराड (उत्तर) १७, कराड (दक्षिण) २९, पाटण २०, सातारा १७.
 

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे अर्ज 
संपू्र्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी खासदार श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), माजी खासदार उदयनराजे भोसले (भाजप), पुरुषोत्तम जाधव (अपक्ष), शिवाजी भोसले (अपक्ष), अलंकृता आवाडे-बिचुकले (अपक्ष), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), ॲड. शिवाजी जाधव (अपक्ष), दीपक ऊर्फ व्यंकटेश महास्वामी (हिंदुस्थान जनता पक्ष) यांनी अर्ज भरले आहेत. याही निवडणुकीचे अंतिम चित्र सोमवारी स्पष्ट होईल.  
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या...सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे...
सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक...सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत...
कार्तिकी वारी कालावधीत गर्दी टाळा :...सोलापूर : ‘‘कार्तिकी वारी ही कोरोनाच्या...
नगरमधील ३२ मंडळात सरासरीच्या दुप्पट पाऊसनगर (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेचे १७ शिक्षक...पुणे  - राज्यात शाळा सुरू करण्याच्या राज्य...
वीज जोडणी तोडण्यास आल्यास घेराव :...कऱ्हाड, जि. सातारा  : नागरिकांना शासनाने...
`वाढीव वीज बिले माफ न केल्यास तीव्र...मुंबई : वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता...
शेतकरी आंदोलकांनी दिली सवलत; पंजाबमध्ये...नवी दिल्ली,  : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे...
सांगलीत चार लाख जनावरांना लाळ खुरकूतचे...सांगली  : जनावरांच्या संभाव्य लाळ खुरकूत...
कृषी विद्यापीठातर्फे उन्हाळी सोयाबीनचे...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
अतिवृष्टीने फुले झडून गेल्याने तुरीच्या...सांगली  : जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा...
चारा पिकांकरिता पाणी आरक्षित करा :...वर्धा  : बोर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन...
वान प्रकल्पाचे ‘पाणी’ तापू लागलेअकोला  : जिल्‍‍ह्यात तेल्हारा तालुक्यात...
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...