Agriculture news in marathi One hundred thirty five crore funds to the Nagar district | Agrowon

नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला १३५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला १३५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यामध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणतः तीन लाख ७१ हजार हेक्‍टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. प्रशासनाने तसेच तलाठी व महसूल यंत्रणेने तसेच कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल हा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकसान झालेल्या गावांना मदत देण्याचा निर्णय घेऊन मदत जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये साधारणता ४७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर केले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना जो काही शासन निर्णय दिलेला आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. निधीचे वितरित केल्यानंतर तसेच रक्कम वाटप झाल्यानंतर लाभार्थी यादी त्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देशसुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
नगर जिल्ह्यासाठी १३५ कोटी रुपयांच्या अनुदान येथील प्रशासनास प्राप्त झाले आहे. सर्च अनुदान हे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वाटप करायचे आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. फळबागांचेसुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे दिलेली रक्कम ही वाढवून मिळावी, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी, तसेच विविध राजकीय पक्षांनी अगोदरच केलेल्या आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नुकसानीचे १३५ कोटी रुपये नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले आहे. आगामी काळामध्ये रक्कम उर्वरित किती व कधी येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.


इतर ताज्या घडामोडी
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...