One hundred thousand quintals of gram seed required in Khandesh
One hundred thousand quintals of gram seed required in Khandesh

खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा बियाण्याची गरज

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू होणार आहे. हरभऱ्याची खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे.

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू होणार आहे. हरभऱ्याची खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. पेरणीसाठी हरभरा बियाण्याची सुमारे सव्वालाख ते एक लाख १४० हजार क्विंटल बियाण्याची गरज भासू शकते. त्यानुसार कृषी यंत्रणांनी पूर्वतयारी केली आहे.

महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून हरभरा बियाण्याचा पुरवठा होईल. यात महाबीजतर्फे कृषी विद्यापीठांनी संशोधन केलेल्या वाणांचा पुरवठा होईल. महाबीजकडून जळगाव जिल्ह्यात सुमारे १६ हजार क्विंटल हरभरा बियाण्याचा पुरवठा होईल. तसेच राष्ट्रीय बियाणे महामंडळातर्फेदेखील सुमारे सहा हजार क्विंटल पुरवठा होईल. मंजुऱ्यांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

खासगी कंपन्यांकडून सर्वाधिक पुरवठा होईल. खासगी कंपन्यांतर्फे मका, बाजरी, गहू बियाण्याचा सर्वाधिक पुरवठा होईल. 

अनेक शेतकरी गहू व हरभऱ्याचे घरात शास्त्रीय पद्धतीने साठविलेले वाण वापरात आणतील. हरभरा पेरताना हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाण्याची गरज असते. तर, गव्हाचे हेक्टरी एक क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागेल. गव्हाचे बियाणेदेखील महाबीज व बियाणे महामंडळाकडून बाजारात उपलब्ध होईल. अनुदानावर बियाणेदेखील दिले जाईल. त्यासंबंधीची घोषणा अधिकृतपणे शासकीय यंत्रणांनी जारी केलेली नाही. 

मका पिकाची मोठी लागवड होईल. यामुळे मका बियाणे उपलब्ध करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होईल. गेल्या वर्षी मका बियाणे महागले होते. प्रतिपाच किलो बॅगसाठी ११०० ते १५०० रुपये दर होता.

काही कंपन्यांकडून चार किलोच्या बॅगाही देण्यात आल्या होत्या. मक्याची सुमारे दोन लाख हेक्टरवर खानदेशात लागवडीची शक्यता आहे. यामुळे सुमारे चार लाख बॅगा (एक बॅग पाच किलो) एवढी मका बियाण्याची मागणी राहील. यासोबत बाजरीचे बियाणेदेखील अधिक वापरात येईल. अनेक शेतकरी कापूस पीक उपटल्यानंतर बाजरीची जानेवारीअखेरिस पेरणी करतील. 

हरभऱ्याचे क्षेत्र जळगाव जिल्ह्यात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्र राहू शकते. रब्बीची पेरणी जळगाव जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर होईल. हरभरा बियाणे अधिक लागेल. परंतु, अनेक शेतकरी घरात साठविलेल्या बियाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे बियाण्याची टंचाई नसेल.  - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com