Agriculture news in marathi, For one irrigation scheme 50 crore | Page 2 ||| Agrowon

एकरूख सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये देणार : जलसंपदामंत्री जयंत पाटील

गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी महत्त्वाच्या असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांना गती द्या, आगामी विधिमंडळ अधिवेशनात योजनेसाठी आणखी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात येतील’’, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी महत्त्वाच्या असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांना गती द्या, आगामी विधिमंडळ अधिवेशनात योजनेसाठी आणखी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात येतील’’, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मागणीनुसार, नुकतीच मुंबईत मंत्रालयामध्ये जलसंपदामंत्री पाटील यांनी एकरुख योजनेविषयी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी हा आदेश दिला. एकरूख योजनेमुळे कुरनूर धरणात पाणी येणार आहे. त्यामुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही योजना पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामांसाठी माजी मंत्री म्हेत्रे यांनी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही बैठक बोलावली होती. 

दरम्यान, म्हेत्रे यांनी बोरी येथील बबलाद बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतराची मागणी केली होती. यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. या बैठकीस माजी मंत्री म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे सचिव कोव्हीकर, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक व्ही. जी. रजपूत, भीमा खोरे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डी. बी. साळे, अधीक्षक अभियंता जे. एस. शिंदे, पुण्याचे मुख्य अभियंता धुमाळ, अश्पाक बळोरगी, शिवराज स्वामी, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, विलास गव्हाणे, संजय मोरे, मोहन देडे उपस्थित होते.

  ‘वर्षभरात योजना पूर्ण करा’

एकरूख योजनेला निधी देऊ, त्यामुळे ही योजना पूर्णत्वास जाईल. त्याशिवाय देगाव एक्स्प्रेस कालव्याचे २६ ते ६४ किलोमीटरपर्यंत सर्वेक्षण करा. त्यासाठी भूसंपादन करा, कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात योजना कार्यान्वित झाली पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स

इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...