agriculture news in Marathi one lac farmers register for tur procurement Maharashtra | Page 3 ||| Agrowon

एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी नावनोंदणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला काही ठिकाणी बुधवार (ता. २०) पासून सुरुवात झाली आहे. तूर खरेदी सुरू करण्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पुढाकार घेतला आहे.

अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला काही ठिकाणी बुधवार (ता. २०) पासून सुरुवात झाली आहे. तूर खरेदी सुरू करण्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. यंदा सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने यावर्षी ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असून, सध्या बाजारात या दराच्या बरोबरीने भाव मिळत असल्याने यंदाच्या शासकीय खरेदीला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत सुरुवातीपासूनच साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

तूर खरेदीच्या दृष्टीने यापूर्वीच नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार बुधवारपर्यंत ९९७५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.  विदर्भ मार्केटिंग फेडरेशन राज्यातील १४ जिल्ह्यांत ३६ केंद्रांवरून खरेदी करणार आहे. तर पणन विभागाची १८३ केंद्रे राहणार आहेत. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठी संधी देण्यात आली असून, या कंपन्यांमार्फत १३७ ठिकाणी केंद्रे उघडण्याचे नियोजन असल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या नोंदणीचा आढावा घेतला असताना विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे ३८२६९ शेतकरी, पणन विभागाकडे ५३९९९ आणि शेतकरी कंपन्यांच्या केंद्रावर ७४८६ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये चांगल्या दर्जाची तूर सहा हजारांपेक्षा अधिक दराने विकत आहे. अकोला बाजार समितीत गुरुवारी उत्कृष्ट दर्जाच्या तुरीला ६१०० रुपये, तर सरासरी ५८०० रुपयांचा दर मिळाला. तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. अशा वेळी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर किती माल विक्रीला येईल याबाबत यंत्रणांना शंका आहे. सध्या तूर खरेदीसाठी जे केंद्र सुरू झाले तेथे मोजमापासाठीच तूर आलेली होती. कुठेही गर्दीसारखा प्रकार नसल्याचे सूत्राने सांगितले. सध्या तूर काढणीला वेग येत आहे. पुढील महिन्यात तूर विक्रीसाठी अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार आहे. तेव्हा या खरेदी केंद्रांना अधिक प्रतिसादाची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...
मराठवाड्यात ‘पूर्वमोसमी’चे दणके सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
विक्रीपूर्वी सोयाबीन चाचणीवर...अकोला ः राज्यात या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री...
‘आत्मा’अंतर्गत शेतकरी समित्यांची...अकोला ः राज्यात कृषी विस्तारविषयक सुधारणांसाठी...
तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष खरड...सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात...
खत उद्योगाचे सावध नियोजन पुणे  : गेल्या हंगामातील पहिल्या...
राज्यात पूर्वमोसमी, गारपिटीने पिकांचे...पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक...
सांगलीत बेदाणा सौदे बंद सांगली ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री...
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणारपुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने...
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणीअकोला : उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...