agriculture news in Marathi one lac people evacuated Maharashtra | Agrowon

एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढत असून, रायगडसह किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणातील काही भागाला तडाखा बसला आहे. 

‘‘मुंबई-ठाण्याचा काही भाग चक्रीवादळाच्या पट्ट्यात आहे. वादळ दिशा बदलण्याची शक्यता कमी असून जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा तशी वेग १०० ते ११० किलोमीटर असल्याची,’’ माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. ‘‘वादळाची लँडफॉल हेण्यास सुरुवात झाली असून ही संपूर्ण प्रक्रिया तीन तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या अलिबागमध्ये जोर असून १२५ किलोमीटर प्रतितास वारे वाहत असल्याचेही,’’ त्यांनी सांगितले आहे. 

दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दुपारी १२.२० च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास १३० किलोमीटर अंतरावर पोहोचले होते. रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्याने जोरदार वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटरवर पोहोचला. चक्रीवादळाचा प्रभाव दोन दिवस महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसला आहे. 
 


इतर बातम्या
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३०...सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व...
सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख...सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे...