एक लाख टन मका म्यानमारमधून आयात

maize
maize

नवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने बाजारात मक्याचे दर वाढले होते. त्यामुळे केंद्राने परवानगी दिल्यानंतर म्यानमारमधून व्यापाऱ्यांनी शून्य टक्के शुल्काने एक लाख टन मका आयात केला आहे. ही आयात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झाली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. म्यानमारमधून मका आयात शुल्कविरहित आहे. भारत मका आयातीवर ६० टक्के शुल्क लावले जाते. तसेच जणुकीय सुधारित नसलेल्या मक्याची आयात आयात केली जाते. परंतु, म्यानमारला संयुक्त राष्ट्रांनी १९८७ ला अल्प विकसित देशाचा दर्जा दिला आहे. भारतानेही अल्प विकसित देशांमधून काही वस्तूंवरील आयात शुल्क शून्य केले आहे. त्यामुळे देशात झालेली मका आयात ही शून्य टक्के शुल्कावर झाली आहे.  ‘‘देशात यंदा मका उत्पादन कमी झाल्याने बाजारात दर वाढले होते. त्यामुळे केंद्राने परवानगी दिल्यानंतर देशातील व्यापाऱ्यांनी शेजारच्या देशांतून दीड लाख टन मका आयातीचे करार केले होते. या करारांपैकी एक लाख टन मका आयात झाली आहे. मात्र, देशातील दर नरमल्यानंतर करार केलेल्या ५० हजार टन मक्याची आयात रद्द करण्यात आली आहे. म्यानमारधून २६० आणि २७५ डॉलर प्रतिटन या दराप्रमाणे मका आयात करण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.   देशातील बाजारात आवक वाढल्यामुळे दर नरमल्यामुळे व्यापाऱ्यांनी आणखी आयातीचे करार केले नाहित. २०१९-२० च्या रब्बी हंगामात मका उत्पादन ८२ लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील बाजारात खरिपात उशिरा लागवड झालेल्या मक्याची आवक बाजारात वाढल्यामुळे दर कमी  झाले आहेत. निजामाबाद बाजारात मका दर सध्या १७५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मागील काही दिवसांत हेच दर दोन हजार ते दोन हजार १०० रुपये प्रतिक्विटंल होते. उद्योगांकडून आयातीची शक्यता देशातील पोल्ट्री उद्योग, पशुखाद्यनिर्मिती उद्योग आणि स्टार्चनिर्माती उद्योग बाजारातील आवक आणि दराची प्रवृत्ती पाहता आणखी मका आयात करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन हंगामांत मका पिकावर विविध नैसर्गिक संकटांनी आघात केल्याने उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी, चढ्या दराने मका विकत घ्यावा लागला होता. आता नवीन मका एप्रिलमध्ये उद्योगांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उद्योग आयातीकडे वळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com