‘रोहयो’च्या कामावर एक लाख मजूर

रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजना

नगर ः यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने उरकत आले असले तरी, अजूनही बऱ्याच भागात पूरेसा पाऊस नाही. ज्या भागात आहे तेथे पूराचा फटका बसला आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सध्या एक लाख ९ हजार ८८४ मजूर काम करत असल्याचा अहवाल आहे. सर्वाधिक मजूर अमरावती, नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये असल्याचे दिसत आहे.  ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा आणि विकासकामांनाही गती मिळावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सरकारी यंत्रणेसह गाव पातळीवर विविध कामे केली जात आहेत. या कामांचा ग्रामविकासाला मोठा फायदा होत आहे. गेल्या वर्षभरात दुष्काळ होता. त्या काळात रोहयोच्या कामावरील मजुरांची संख्या दुपटीने वाढून तीन लाख मजुरांपर्यंत गेली होती. आता पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी होत आला आहे. मात्र नगरसह राज्याच्या अनेक भागात अजून पुरेसा पाऊस नाही. खरिपाची पिके अडचणीत असून रब्बीचीही शाश्वती वाटेना झाली आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सध्याही राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये रोजगार हमीच्या कामावर एक लाख ९ हजार ८८४ मजूर काम करत असल्याचा अहवाल आहे.  सर्वाधिक मजूर अमरावती, नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये आहेत. राज्यात २८ हजार ६३५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील साधारण पंचवीस टक्के ग्रामपंचायतीत कामे सुरू आहेत. रोजगार हमीच्या कामावर सध्या मजुरांची संख्या कमी असली तरी पावसाळ्यात एक लाख मजूर काम करत असल्याचा आकडाही विचार करायला लावणारा आहे. ग्रामसेवकांचे कामबंद अंदोलन सुरू आहे. त्याचा मात्र रोजगार हमीच्या कामावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हानिहाय मजूर संख्या (कंसात ग्रामपंचायती)  नगर ः ७३७२ (४१०), अकोला ः १८४० (८७), अमरावती ः १२,८१३ (६१७), औरंगाबाद ः २४५८ (१३९), बीड ः ६८६ (४३), भंडारा ः ३०३३ (१८०), बुलडाणा ः ४५१९ (३५२), चंद्रपूर ः ३९६१ (२७१), धुळे ः १९३१ (९३), गडचिरोली ः २०७८ (१२१), गोंदिया ः ५९८० (१८८), हिगोंली ः २३४५ (१०८), जळगाव ः २५२७ (२३१), जालना ः ६१९५ ( १४४), कोल्हापूर ः ९०९ (८६), लातूर ः २४२७ (११३), नागपूर ः ३७५८ (३११), नांदेड ः ५९५४ (३०६), ५८६५, नंदुरबार ः (२३०), नाशिक ः ७३३३ (३३६), उस्मानाबाद ः १२०६ (७९), पालघर ः २५६१ (१०३), परभणी ः १३४५ (१००), पुणे ः १०३० (९०), रायगड ः ७७ (८१२) रत्नागिरी ः १४०६ (७८), सांगली ः १९९९ (११६), सातारा ः १३२५ (९३), सिंधुदुर्ग ः ९०७ (७०), सोलापूर ः ९०७ (६४), ठाणे ः ५७९ (६४), वर्धा ः २८२९ (२८०), वाशीम ः ३२५३ (१४१), यवतमाळ ः ५८८२ (३८२),

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com