agriculture news in marathi, one lack hector crops damages due to rain, pune, maharashtra | Agrowon

पावसामुळे पुणे विभागात सव्वालाखावर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पुणे  : गेल्या आठ दिवसांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्याचे आदेश दिले असून येत्या पाच दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे  : गेल्या आठ दिवसांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्याचे आदेश दिले असून येत्या पाच दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात झालेल्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात रविवारी येथील विभागीय आयुक्तलयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की गेले दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. विभागातील सांगली जिल्ह्यात ६५ हजार २६७, सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार ३४५, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८०, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८००  व कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विभागातील ५१ तालुके बाधित
पुणे विभागात एकूण ५१ तालुके बाधित असून, एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील काही भागांतील गावांना भेटी देत आपण पाहणी केली असून, या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील. हे पंचनामे करीत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधित झाले आहे, याबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकाचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेऊन त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे. पुणे विभागात रविवार अखेर सरासरी १३७.२४ टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक १८२.५ टक्के पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८.५, सातारा जिल्ह्यात १७०.८६, सोलापूर जिल्ह्यात ९१.७५, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२०.२४ टक्के पाऊस झाला आहे.

पावसामुळे झालेले नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले तरी गेल्या महिन्यात झालेल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे सुमारे एक लाख ८९ हजार १४८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागात एकूण दोन महिन्यांत झालेल्या नुकसानीचे क्षेत्र हे मोठे आहे. विभागात ३३ हजार १८० हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ भात, बाजरी, मका, भूईमूग, सोयाबीन, तूर, भाजीपाला, फळांचे मोठे नुकसान झाले आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...