एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११३९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
One lakh 69 thousand farmers are debt free
One lakh 69 thousand farmers are debt free

बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११३९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ही रक्कम थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे,’’ अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.  प्रजासत्ताकदिनी आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्‍वेताताई महाले, जि.प अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे व इतर उपस्थित होते.  डॉ. शिंगणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा हवालदिल परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. खरीप हंगामात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे दोन लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. निकषानुसार ९६ हजार ४५७ शेतकऱ्यांना ७४ कोटी ८७ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये एक लाख २५ हजार २१ शेतकऱ्यांना ९९ कोटी ९१ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.’’  जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. शिंगणे म्हणाले, ‘‘पुढील २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २५७ कोटी वित्तीय मर्यादेपेक्षा ५७ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला ३१५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून गाव तेथे वाचनालय, रस्ते निर्मिती व आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून आजपर्यंत १८ हजार ११७ घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिगावसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. जिगाव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील २२ गावांपैकी सहा गावांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच १० गावांचे पुनर्वसन प्रगतिपथावर आहे,’’ अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली. 

५३ हजार ३२७ व्यक्तींना रोजगार  कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १८ वर्षे वयोगटापुढील लाभार्थ्यांना १६ लाख ८० हजार ८३६ लसीचा पहिला डोस घेतला असून १० लाख ४२ हजार ५९१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ५३ हजार ३२७ व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात रोहयोअंतर्गत ८३१ कामे सुरू असून, त्यावर चार हजार २७५ मजुरांची उपस्थिती आहे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com