नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप

One lakh 85 thousand tonnes of sugarcane silt in four districts of Nanded region
One lakh 85 thousand tonnes of sugarcane silt in four districts of Nanded region

नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात बुधवार (ता.११) पर्यंत १ लाख ८५ हजार २६० टन उसाचे गाळप केले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातंर्गंत नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी हे गाळप केले. त्यांनी सरासरी ७.६१ टक्के उताऱ्यांने १ लाख ४१ हजार ५० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

यंदाच्या, हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी ८ साखर कारखान्यांनी बुधवार (ता.११) पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील ५ पैकी १ साखर कारखान्याने (बळीराजा, ता. पूर्णा) ४४ हजार ७९० टन उसाचे गाळप केले. सरासरी ८.३६ टक्के उताऱ्याने ३७ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. हिंगोली जिल्ह्यतील २ सहकारी  आणि १ खासगी साखर कारखान्याने ६३ हजार ८६० टन उसाचे गाळप केले.

सरासरी ८.९६ टक्के उताऱ्याने ५७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. शिरूर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १०.७८ टक्के आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी १ सहकारी आणि १ खासगी साखर कारखान्यांनी एकूण ३९ हजार टन उसाचे गाळप केले. सरासरी ६.५९ टक्के साखर उताऱ्याने २५ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

कुंटूरकर शुगर (जय अंबिकार) साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ७.२ टक्के आला. लातूर जिल्ह्यातील २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी ४६ हजार ५०० टन उसाचे गाळप केले. सरासरी ७.०५ टक्के साखर उताऱ्याने ३२ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सिद्धी शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ५.६५ टक्के आला आहे.

ऊस गाळप (टनांमध्ये), साखर गाळप स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने संख्या ऊस गाळप साखर उतारा
परभणी १  ४४७९०  ३७४५० 
हिंगोली ३  ६३८६०  ५७२००
नांदेड ३९००० २५७०० 
लातूर  ३७६१०  २०७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com