नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा

नांदेड ः मागील आठवडाभरात ४ हजार ७७३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३७ लाख ६२ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले. १ लाख ९२ हजार ७३३ शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळण्याची प्रतीक्षी आहे.
 One lakh 92 thousand farmers in Nanded district are waiting for crop loan
One lakh 92 thousand farmers in Nanded district are waiting for crop loan

नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने पीककर्जाची मागणी केली आहे. सोमवार (ता.१०) पर्यंत विविध बॅंकांनी ७५ हजार २६७ शेतकऱ्यांना ४१० कोटी ६७ लाख ३५ हजार रुपये (२१.२५ टक्के) पीक कर्जवाटप केले. मागील आठवडाभरात ४ हजार ७७३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३७ लाख ६२ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले. १ लाख ९२ हजार ७३३ शेतकऱ्यांना अजूनही कर्ज मिळण्याची प्रतीक्षी आहे.

पीक कर्जवाटपात व्यापारी आणि खासगी बॅंका कमालीच्या उदासीन दिसत आहेत. या बॅंकांचे कर्जवाटप सावकाश सुरु आहे. त्यांनी आजवर केवळ ६.१७ टक्के पीक कर्जवाटप केले.  महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने थोडी गती घेतली आहे. उद्दिष्टाच्या २५ टक्केचा टप्पा पार केला आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त  शेतकऱ्यांना वितरण झाल्यानंतर पीक कर्जवाटप बंद केले आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सार्वजिनक क्षेत्रातील, सहकारी, खासगी बॅंकांना एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. सोमवार (ता.१०) अखेर जिल्हा बॅंकेत ५५ हजार १२५ शेतकऱ्यांना २५८ कोटी २६ लाख १८ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या १३९.०४ टक्के पीक कर्जवाटप केले.

व्यापारी आणि खासगी बॅंकांनी ८ हजार ३१६ शेतकऱ्यांना ९६ कोटी १४ लाख ४५ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ११ हजार ८२६ शेतकऱ्यांना ७७ कोटी २६ लाख ७२ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले.

अनेक बॅंका जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील यंदा नवीन पीककर्ज मंजुरीसाठी फेरफार नक्कल, टोच नकाशा, बेबाकी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मागत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, तसेच अन्य बॅंकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वेळ जात आहे.

खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जुन्या शेतकऱ्यांकडे पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. तरीही बॅंका मनमानी करत त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल ‘जैसे थे’ आहेत. 

कर्जवाटप स्थिती

बॅंक उद्दिष्ट  वाटप रक्कम (कोटी) टक्के  शेतकरी संख्या
जिल्हा बॅंक १८५.७४  २५८.२६ १३९.०४ ५५१२५
व्यापारी बॅंका १५५७.६७  ९६.१४ ६.१७ ८३१६
म.ग्रा.बॅंक  २८८.२५ ७७.२६ २६.८१   ११८२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com