नगरमध्ये एक लाख हेक्टर कांदा लागवड

दरात पडझड, पाऊस व वातावरणामुळे सातत्याने होत नुकसान होत असल्याने उत्पादक अडचणीत असला तरी नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. नगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीत तब्बल १ लाख ६ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
One lakh hectare onion cultivation in the town
One lakh hectare onion cultivation in the town

नगर ः दरात पडझड, पाऊस व वातावरणामुळे सातत्याने होत नुकसान होत असल्याने उत्पादक अडचणीत असला तरी नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. नगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीत तब्बल १ लाख ६ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अजून किमान पंचवीस हजार हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

नगर जिल्हयात खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारण १ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होत असते. यंदा पाण्याची उपलब्धता अधिक आहे. मात्र, यंदा कांदा उत्पादक सतत अडचणीत आहेत. कोरोना काळात कांद्याचे दर पडलेले होते. पावसाने जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. त्यानंतर परतीच्या पावसानेही कांदा उत्पादक अडचणीत आले. रब्बीत लागवड करण्यासाठी गावरान बियाणे मिळाले नसल्याने चढ्या दराने बियाणे खरेदी करून लागवड करावी लागली. आताही पंधरा दिवसांपासून दरात सतत चढउतार होत आहे. तरीही यंदा १ लाख ६ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अजूनही कांदा लागवडी सुरुच आहेत. खरिपात पंचवीस हजार हेक्टवर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. यंदा कांदा उत्पादक सातत्याने अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत झालेली तालुकानिहाय कांदा लागवड क्षेत्र (हेक्टर) ः नगर ः १७,५२९, पारनेर ः २३,२५८, श्रीगोंदा ः १४,९२४, कर्जत ः ९,०७४, जामखेड ः ३,२५०, शेवगाव ः ३,०६६, पाथर्डी ः ७,१४८,  नेवासा ः १,७१३, राहुरी ः २,५६०, संगमनेर ः ७,७३२, अकोले ः २,८०९, कोपरगाव ः ६,१७४, श्रीरामपूर ः ३,५६९, राहाता ः २६७८.

लाल कांद्याची अधिक लागवड नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कांद्याचे पीक घेतले जाते. रब्बीत बहुतांश शेतकरी गावरान कांद्याची लागवड करत असतात. यंदा मात्र गावरान कांद्याचे बियाणाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी लाल कांदा व घरगुती तयार केलेले बियाणे लागवडीसाठी वापरले आहे. त्यामुळे यंदा फार काळ कांदा साठवण करता येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मार्च ते एप्रिल काळात बाजारात कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com