Agriculture news in Marathi One lakh twenty five thousand farmers benefit from crop loan interest waiver | Agrowon

अमरावती : पीककर्जाच्या व्याज माफीचा सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे व्याज राज्य शासन भरणार आहे. खरिपासाठी कर्ज मिळावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे व्याज राज्य शासन भरणार आहे. खरिपासाठी कर्ज मिळावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, याकरिता महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी कर्जमाफीपात्र शेतकऱ्यांचे व्याज शासनस्तरावरुन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार खात्यांची यादी या संदर्भाने अपलोड करण्यात आली असून लवकरच याबाबत पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. जिल्हा बॅंकेतील प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना थकबाकीदार न कानता पीककर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित बॅंकांनी सदर खातेदाराची थकबाकी ही शासनाकडून येणे दर्शवावे व त्याला कर्ज द्यावे, असे स्पष्ट निर्देश आहेत.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...