agriculture news in Marathi, one member with farmer from family will get benefit of insurance scheme, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास मंगळवारी (ता.२०) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरूप लाभले आहे.

मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास मंगळवारी (ता.२०) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरूप लाभले आहे.

शेती व्यवसाय करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार शासनाने नियुक्त केलेली विमा कंपनी २ लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते.

प्रचलित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब विमाछत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वहितीधारक शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठीदेखील लाभ देण्यात येणार आहे.

यामध्ये वहितीधारक म्हणून नोंद नसलेले कोणतेही १ सदस्य म्हणून शेतकऱ्याचे आईवडील, पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यासह कुटुंबातील एक सदस्य अशा २ जणांना या योजनेतून विमाछत्र लाभणार आहे.

ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातील कोणताही १ सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत.

विमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन विमा कंपनीकडे भरणार आहे. त्यामुळे शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्त‍ीने किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही.

इतर अॅग्रो विशेष
अंगावर काटा येणारच!देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...
कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...
कांदा दरवाढीचा कल कायम राहणारपुणे : केंद्र सरकारकृत एमएमटीसी या ट्रेडिंग...
साखर निर्यातीची अधिसूचना अखेर जारीपुणे : देशातील भरमसाठ साखरेचा साठा बघता ६० लाख टन...
जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा...
पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत...मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट...
दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः...पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव...
‘समृद्धी’साठी २८ हजार कोटींचे कर्ज...मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्षपुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना...
‘वान’च्या पाणी आरक्षणाला...अकोला  ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातून अकोला...
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी...सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या...
संत्रा छाटणीकरिता आता विदेशी सयंत्राचा...नागपूर ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
गटशेती योजना चांगली; पण...रा ज्यातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली...
मराठवाड्यात उसाला पर्याय हवाचयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी...
गडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात...नागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम...
एफआरपीच्या व्याजाबाबत साखर आयुक्तालयात...पुणे  : उसाच्या थकीत एफआरपीचे विलंब व्याज...
जोर ओसरला; उत्तर कोकण, उत्तर...पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...