Agriculture news in marathi, One million farmers in Vidarbha on wind | Agrowon

विदर्भात दहा लाखांवर शेतकरी अडचणीत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

विमा काढण्यासाठी कृषी विभागाने जागृती करीत प्रोत्साहन दिले. परंतु आता मात्र विमा कंपन्यांकडून प्रक्रियेसंदर्भात टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे यापुढे कोणावर आणि कसा भरवसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. महागाव तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक दिवाळीच्या सुटीवर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा कोणत्या व्यवस्थेकडे मांडाव्या, असा प्रश्‍न आहे. यापुढील काळात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही.’’
- मनीष जाधव, शेतकरी वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ

नागपूर : संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. प्रशासनाच्या आवाहनानंतर विदर्भात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला. आता मात्र कंपन्यांकडून नुकसान अर्ज स्वीकारल्याची पावती देण्यासही टाळाटाळ होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष असून, त्याचा उद्रेक होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

विदर्भात सुमारे दहा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, धान, तूर, उडीद, मूग यांसारख्या पिकांचा विमा उतविला. विमा हप्ता म्हणून कोट्यवधी रुपयांचा भरणादेखील कंपनीकडे करण्यात आला आहे. परंतु आता नुकसानीनंतर मात्र कंपन्यांकडून भरपाई संदर्भाने प्रक्रियेस टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.

नुकसानाच्या ७२ तासांत संबंधित कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. विमा कंपनीला कळविण्याकरिता खास अर्ज देखील आहे. तालुकास्तरावरील कंपनी प्रतिनिधीला सूचनापत्र दिल्यानंतर त्याची पावती मिळते. त्यानंतर कंपनी प्रतिनिधीकडून त्यांच्यास्तरावर सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया होते. सध्या विदर्भात सर्वदूर नुकसान झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांची कंपनीला सूचना पत्र देण्याची लगबग वाढीस लागली आहे. परंतु तालुकास्तरावरील कंपनी प्रतिनिधींनी त्यांचे फोनच बंद करून ठेवल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ७२ तासांत कळविण्याच्या निकषाचे पालन कसे होईल, या विवंचनेत शेतकरी आहेत.

कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच या मुद्यावर घेरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती  जिल्ह्यात तीन हजार, दहा हजार वाशीम, अकोला तीन हजार याप्रमाणे सूचनापत्र संबंधित विमा कंपनी प्रतिनिधींकडे पोचले आहेत. यात संख्येत येत्या काळात वाढीची शक्‍यता वर्तविली गेली आहे. विशेष म्हणजे विमा काढण्यासाठी कृषी विभागाकडून खरिपात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याच्याच परिणामी गेल्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. 

पीकविमाधारक शेतकरी संख्या 

गोंदिया ७० हजार 
भंडारा  लाख ६२ हजार
चंद्रपूर  ८९ हजार
वर्धा  ३५ हजार 
नागपूर  ५१ हजार 
गडचिरोली   ३५४५४
यवतमाळ १ लाख ९७ हजार 
अमरावती २ लाख ५० हजार 

 


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...