Agriculture news in marathi One person's Corona test report positive in Hingoli | Agrowon

हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका पुरुष रुग्णाचा कोरोना विषाणु चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.

हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका पुरुष रुग्णाचा कोरोना विषाणु चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची अमंलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला विक्री, तसेच किराणा दुकाने देखील शुक्रवार (ता.३) ते रविवार (ता.५) पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांतर्गंत गर्दी टाळावा, यासाठी यापूर्वी भाजीपाला आणि किराणा सामान या सारख्या जीवानावश्यक वस्तु नागरिकांना खरेदी करण्यासाठी एक दिवसा आड वेळापत्रक निश्चित केले होते. परंतू, या व्यतिरिक्त दुचाकी,चारचाकी वाहने वैद्यकीय आपात्कालीन सेवेच्या नावाखाली रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले.

जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात मंगळवारी (ता.३१)भरती झालेल्या एका ४९ वर्षीय संशयित रुग्णाच्या घश्यातील स्त्रावाची औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी झाली. त्यानंतर अहवाल सकारात्मक आला. 

या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अन्य चार कोरोना संशयित रुग्णांच्या घशाचा स्त्राव अहवाल प्रलंबित आहेत. मालदिवमधून आलेले २ नागरिक घरातील अलगीकरणात (होम कोरेंटाइन)आहेत. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदी कडक केली जात आहे.

शुक्रवार (ता.३) ते रविवार (ता.५) या कालावधीत जिल्ह्यातील मेडिकल्स दुकाने वगळून भाजीपाला विक्री, किराणा सामान विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचार बंदी काळात वैद्यकीय कारणास्तव परवानगी दिलेले,अत्यावश्यक सेवा पुरवठा, कार्यलयीन ओळखपत्र असलेले कर्मचाऱ्यांची वाहने सोडून इतर दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...