मराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठे, मध्यम, लघू अशा ८७२ धरणांत पुरेसा पाणीसाठा झ
बातम्या
पुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया दिवाळी बोनस
पुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत प्रति लिटरला १ रुपया बोनस जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मंगळवारी (ता. १७) झालेल्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी त्याची घोषणा केली. तर ही रक्कम एकरकमी देण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी केली.
संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्यालयातील आवारात झाली. यावेळी अध्यक्ष हिंगे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष हिंगे म्हणाले, ‘‘दूध व्यवसाय अडचणीत असताना देखील खासगी संघापेक्षा जिल्हा संघाने ५ रुपये अतिरिक्त दर दिला आहे. संघाने गायीच्या दुधाला २५ रुपये १६ पैसे तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये ७२ पैसे दर दिला आहे. यंदा संघाला २ कोटीपेक्षा अधिक नफा झाला असून, संघाच्या वतीने ८४ कोटींच्या अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून ६० कोटी रुपये मंजूर झाले असून, उर्वरित निधी संघ स्वनिधीमधून उभारणार आहे. तर कोंढापुरी येथे ३ कोटी रुपये खर्चून पशुखाद्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.’’
यावेळी दूध संकलन आणि दूध उत्पादनात उल्लेखनिय कार्य केलेल्या संस्था आणि शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षिरसागर यांनी केले.
अन्यथा तुमच्यावर पक्षांतराची वेळ येईल
सहकारातील लपवा लपवी केल्याने अनेक नेत्यांवर पक्षांतराची वेळ आली आहे. आपण काही लपवा लपवी करू नका आपल्यावर तशी वेळ येऊच देऊ नका, असा शालजोडीतला सल्ला सभासदांनी यावेळी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
- 1 of 1492
- ››