agriculture news in marathi one thousand affected by corona in ten days in india | Agrowon

कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने; आत्तापर्यंत ५१ जणांचा मृत्यू

वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

 कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने होत असून आत्तापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे एका युवकाचा तर इंदूरमधील ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने होत असून आत्तापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे एका युवकाचा तर इंदूरमधील ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमध्ये बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या २५ वर्षांच्या युवकाचा सोमवारी (ता. ३०) मृत्यू झाला होता. त्याचा चाचणी अहवाल आज मिळाला. त्यात या युवकाला कोरोनाची लागण झाली होती, असे निदान करण्यात आले आहे. श्‍वसनाच्या त्रासामुळे कुटुंबीयांनी त्याला रविवारी (ता. २९) रुग्णालयात दाखल केले होते. त्याला फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा विकार होता.

देशात काल सहा जणांचा मृत्यू झाला. चंडिगडमध्ये पंजाबचे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर केरळमध्ये तिरुअनंतपुरममध्ये कोरोनाची लागण झालेल्या ६८ वर्षांच्या व्यक्तीचे निधन झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. याशिवाय मध्य प्रदेशमध्ये इंदूरमधील महिलेचाही मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आणखी दोन बळी
पश्‍चिम बंगालमध्ये एकाचा आणि महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. बंगालमधील एका ४८ वर्षांच्या महिलेला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तिला श्‍वास घेताना त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील पालघरमध्ये ५० वर्षांच्या प्रौढाचा मृत्यू झाला. दुसरी घटना मुंबईतील वरळीत घडली. तेथे खासगी रुग्णालयात दाखल ७५ वर्षांच्या वृद्धाचे सोमवारी निधन झाले. त्याला मधुमेह व श्‍वसनाचा त्रास होता. मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. काल त्याला विषाणूंची लागण झाली असल्याचे निदान झाले. आता त्‍याच्या संपूर्ण कुटुंबाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मुंबईत 
वरळी येथे सर्वांत जास्त १४ बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मरण पावलेल्यांची महाराष्ट्रातील संख्या आता १२ झाली आहे.

कोरोनाबाधितांची राज्यानिहाय मृतांचा तपशील

तारीख मृत्यू राज्य वयवर्षे
११ मार्च पहिला मृत्यू कर्नाटक ७६
१३ मार्च दुसरा मृत्यू नवी दिल्ली ६८ (महिला)
१७ मार्च तिसरा मृत्यू महाराष्ट्र ६३ (महिला)
१८ मार्च चौथा मृत्यू पंजाब ७०
२१ मार्च पाचवा मृत्यू महाराष्ट्र ६३
२१ मार्च सहावा मृत्यू बिहार ३८
२२ मार्च सातवा मृत्यू गुजरात ६७
२३ मार्च आठवा मृत्यू पं. बंगाल ५७
२३ मार्च नववा मृत्यू हिमाचल प्रदेश ८६
२४ मार्च दहावा मृत्यू महाराष्ट्र ६५
२५ मार्च अकरावा मृत्यू तमिळनाडू ५४
२५ मार्च बारावा मृत्यू मध्य प्रदेश ६५ (महिला)
२५ मार्च तेरावा मृत्यू गुजरात ८५ (महिला)
२६ मार्च चौदावा मृत्यू काश्‍मीर ६५
२६ मार्च पंधरावा मृत्यू महाराष्ट्र ६५
२६ मार्च सोळावा मृत्यू कर्नाटक ७५ (महिला)
२६ मार्च सतरावा मृत्यू राजस्थान ७३
२६ मार्च अठरावा मृत्यू गुजरात ७०
२६ मार्च एकोणिसावा मृत्यू मध्य प्रदेश ६५
२७ मार्च एकविसावा मृत्यू कर्नाटक ६५
२७ मार्च बाविसावा मृत्यू महाराष्ट्र ६५ (महिला)
२८ मार्च तेविसावा मृत्यू केरळ ६९
२८ मार्च चोविसावा मृत्यू गुजरात ४६
२८ मार्च पंचविसावा मृत्यू महाराष्ट्र ८५
२८ मार्च सव्विसावा मृत्यू तेलंगण ७५
२९ मार्च सत्ताविसावा मृत्यू जम्मू-काश्‍मीर ६२
२९ मार्च अठ्ठाविसावा मृत्यू गुजरात ४५
२९ मार्च एकोणतिसावा मृत्यू महाराष्ट्र ४० (महिला)
२९ मार्च तिसावा मृत्यू महाराष्ट्र ४५
२९ मार्च एकतिसावा मृत्यू पंजाब  ६२
३० मार्च बत्तिसावा मृत्यू पं. बंगाल ५४ (महिला)
३० मार्च तेहतिसावा मृत्यू गुजरात ४५ (महिला)
३० मार्च चौतिसावा मृत्यू महाराष्ट्र ५२
३० मार्च पस्तिसावा मृत्यू मध्य प्रदेश ४१
३० मार्च छत्तिसावा मृत्यू महाराष्ट्र ८०
३० मार्च सदतिसावा मृत्यू पंजाब ५५ (महिला)
३० मार्च अडतीस ते बेचाळीस मृत्यू तेलंगण  
३१ मार्च त्रेचाळिसावा मृत्यू मध्य प्रदेश ४९ (महिला)
३१ मार्च चव्वेचाळिसावा मृत्यू केरळ ६८
३१ मार्च पंचेचाळिसावा मृत्यू चंडिगड ६५
३१ मार्च सेहेचाळिसावा मृत्यू पं. बंगाल ४८ (महिला)
३१ मार्च सत्तेचाळिसावा मृत्यू महाराष्‍ट्र ५०
३१ मार्च अठ्ठेचाळिसावा मृत्यू महाराष्ट्र ७५
३१ मार्च एकोणपन्नासावा मृत्यू मध्य प्रदेश  
१ एप्रिल पन्नासावा मृत्यू मध्य प्रदेश ६५
१ एप्रिल एक्कावन्नावा मृत्यू उत्तर प्रदेश २५

 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....