हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी डाॅलर उभारणारः जेफ बेझोस

jeff bezop
jeff bezop

पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर विदारक रूप घेऊन उभी ठाकली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्‍यक आहे, असे आवाहन करत जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस यांनी हवामानबदलाविरुद्ध लढण्यासाठी एक हजार कोटी डाॅलरचा निधी उभारणार असल्याचे सांगितले.  जेफ बेझोस यांनी सोमवारी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘‘नैसर्गिक जगाला वाचविण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी जे कुणी प्रयत्न करतील त्यांना निधी देण्यात येईल. शास्त्रज्ञ, कार्यकर्ते, स्वयंसेवी संथा आदींना बेझोस अर्थ फंडकडून निधी दिला जाईल.’’ बेझोस हे ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये गुंतवणुक करत आहेत. हवामान बदलावर मात करण्यासाठी आणि जीवाश्‍म इंधनाचा वापर कमी करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, तसेच वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन आणि उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी पतपुरवठा करणे हा या निधीचा मुख्य उद्देश आहे.  जानेवारीच्या पूर्वार्धामध्ये अमेझॉन कर्मचाऱ्यांच्या एका गटाने बेझोस यांच्यावर टीका केली होती. बेझोस यांनी घोषित केलेला निधी आणि अमेझॉन कंपनी तसेच त्यांचे फाउंडेशन यांचा संबंध नाही. हा निधी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीमधून देण्यात येणार आहे. ‘सेव अर्थ’साठी दिलेला निधी हे बेझोस यांचे व्यक्तीगत बांधीलकी असून त्याचा अमेझॉन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांपासून वेगळे आहेत.   एकत्रित काम करणे आवश्‍यक मागील वर्षी अमेझॉनने २०४० पर्यंत शून्य कर्ब उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच २०३० पर्यंत १०० टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचा संकल्प केला आहे. अमेरिकन सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय तंत्रज्ञान कंपन्या व अतिश्रीमंत नागरिक यासाठी पुढाकार घेत आहे. बेझोस यांच्या मते, ‘‘हवामानबदलाच्या समस्येवर लहान-मोठ्या कंपन्या, राष्ट्रे, जागतिक संघटनांबरोबरच वैयक्तिकरीत्याही एकत्रित काम करण्याची आवश्‍यकता आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com