agriculture news in marathi One thousand hundred crore Deposits in Pune District Bank | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्हा बँकेत ११०० कोटींवर ठेवी; २८२.५१ कोटीचा नफा

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

देशातील अग्रगण्य पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मार्च २०२१ अखेर २८२ कोटी ५१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. १०४ वर्षांच्या इतिहासामध्ये बँकेने हा उच्चांक केलेला आहे.

पुणे : देशातील अग्रगण्य पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मार्च २०२१ अखेर २८२ कोटी ५१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. १०४ वर्षांच्या इतिहासामध्ये बँकेने हा उच्चांक केलेला आहे. तसेच मार्च २०२१ अखेर ‘नेट एनपीए’ शून्य टक्के असून बँकेच्या ठेवींनी अकराशे रुपये कोटीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.

मार्च २०२१ अखेर बँकेची एकूण उलाढाल १९ हजार १९८ कोटी ५५ लाख रुपयांची असून सभासद संख्या १० हजार ९६४ एवढी आहे. त्यापैकी ९२३१ सहकारी संस्था व १७३३ व्यक्ती सभासद आहेत. बँकेचे भागभांडवल ३३८ कोटी ८० लाख रुपये आहे. बँकेच्या वसुलीच्या संदर्भात विकास संस्थांनी व शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याने बँकेचा ग्रॉस व नेट एनपीए नाबार्डच्या निकषानुसार निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे.  

बँकेने साखर कारखाने, वि.का.संस्था, पतसंस्था, वैयक्तिक कर्जदार यांना एकूण ८१११ कोटी ५ लाख रुपयांचा विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेने ५२३३ कोटी ८१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असून बँकेचे नेटवर्थ ८१० कोटी १२ लाख रुपये आहे. तसेच बँकेचा सीडी रेशो ७३.१५ टक्के व सीआरएआर ११.७४ टक्के आहे. 

प्रतिक्रिया...
देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात ढोबळ नफा कोणत्याच जिल्हा बँकेला झालेला दिसून येत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन व त्यांनी बँकेस लावलेली शिस्त, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य, तसेच अधिकारी व सेवकवर्ग यांचे योगदानामुळे यशाचे शिखर गाठणे शक्य झाले आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...