agriculture news in marathi, one thousand vehicle vegetable incoming in Mumbai APMC | Agrowon

मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा लिलाव बंद; शनिवारी १००० गाड्यांची आवक

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू झालेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात शनिवारी (ता.२८) सुमारे एक हजार भाजीपाला गाड्यांची आवक झाली. 

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू झालेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात शनिवारी (ता.२८) सुमारे एक हजार भाजीपाला गाड्यांची आवक झाली. 

लॉकडाऊनमुळे राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्भे येथील भाजी व अन्न धान्य या दोन घाऊक बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी बैठका घेऊन व्यापाऱ्यांना या जीवनावश्यक बाजारपेठा सुरू करण्याचा आग्रह केला.  

मुंबईकरांना भाजीपाला पुरवठ्यासाठी बाजार समितीमधील या घाऊक बाजारपेठा २६ मार्चपासून खुल्या केल्या आहेत. बाजारात सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात की नाही, याचा अंदाज घेऊन पुढे बाजार सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बाजार समितीने गुरुवारी सर्व नियम पाळून कशा पद्धतीने आवारात प्रवेश दिला जाईल, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवलेे.

व्यापारी व्यवहार बंद ठेवणार...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.२८) ग्राहक एकमेकांत अंतर न ठेवता गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतकी गर्दी होणे, अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे धास्तावलेल्या भाजीपाला व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या काळात जे व्यापारी व्यवहार सुरू ठेवू इच्छितात त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे.  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीच्या आधारे असे व्यापारी व्यवहार सुरू ठेवू शकतात, असे बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी शंकर पिंगळे यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...