Agriculture News in Marathi For a one-time FRP Movement of Indian Farmers Union | Agrowon

एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे आंदोलन 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराचे तुकडे न पाडता (एफआरपी) रकमेचे वाटप एकरकमीच करावे, या मागणीसाठी संघाने येत्या ३० सप्टेंबरला साखर आयुक्तालयातील आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराचे तुकडे न पाडता (एफआरपी) रकमेचे वाटप एकरकमीच करावे, या मागणीसाठी भारतीय किसान संघाने येत्या ३० सप्टेंबरला साखर आयुक्तालयातील आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 

संघाचे संघटनमंत्री चंदन पाटील, कोषाध्यक्ष बबनराव केंजळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माऊली तुपे यांनी पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा केली. साखर आयुक्तालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सकाळी ११ नंतर सुरू होईल. प्रश्न न सुटल्यास याचवेळी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे. 

‘‘कारखाने संघटित आहेत. त्यांच्या हितासाठी असंघटित शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून एफआरपीचे तुकडे पाडण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी आहे. १९६६ च्या ऊसदर नियंत्रण कायद्यात २००९ मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार वैधानिक किमान भाव (एमएसपी) ऐवजी उत्पादन खर्चावर आधारित एफआरपी देण्याची तरतूद केली गेली आहे. मात्र, कृषिमूल्य आयोगाने एफआरपी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली. यामुळे ऊस उत्पादकांसमोरील समस्या उग्र होतील,’’ असे पाटील यांनी सांगितले. 

ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत ६० टक्के, एक महिन्याने २० टक्के व उर्वरित २० टक्के रक्कम आणखी एका महिन्याने एफआरपी देण्याची ही शिफारस आहे. महाराष्ट्र सरकारने तर एफआरपीचा घोळ आणखी वाढवला आहे. पहिला हप्ता एक महिन्यात ६० टक्के, कारखाना बंद होताना म्हणजे एप्रिल, मेमध्ये २० टक्के व उर्वरित २० टक्के रक्कम पुढील हंगाम सुरू होताना ऑक्टोबरमध्ये देण्याची शेतकरी विरोधी शिफारस केंद्राकडे केली आहे. या दोन्ही शिफारशी दुर्दैवी आहेत, असेही संघाने म्हटले आहे. 

तुपे म्हणाले, ‘‘एफआरपीचे तुकडे केल्यास शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात सापडेल. तीन हप्त्यांत उसाची खरेदी रक्कम घेण्याचे करार हतबल शेतकऱ्यांवर लादले जात आहेत. शेतकऱ्याचे पीककर्ज पहिल्या हप्त्यात फिटणारच नाही. त्यामुळे जमा रकमा बॅंकेतच अडकून पडतील व नवा हंगाम सुरू होताना कर्जाचे नूतनीकरण होईल. परिणामी शेती खर्च, मुलांचे शिक्षण व विवाह, आजारपण यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येईल. त्यामुळे भारतीय किसान संघ या समस्येवर निर्णायक लढा उभारणार आहे.’’ 


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...