agriculture news in marathi, one village, one variety scheme failed in Jarandi | Agrowon

जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

जिनर्स खरेदी करतील या अपेक्षेने कापूस विकला नाही. शेतकऱ्यांना गरज भागविण्याकरिता क्‍विंटलप्रमाणे १ हजार रुपये बचत गटातून कमी व्याजदराने दिले. २५ लाख रुपयांचे वाटप जानेवारीत करण्यात आले. परंतु पदरी निराशाच पडली. सिल्लोडला कापूस आणण्याचे जिनर्सकडून सांगण्यात आले होते. ७० किलोमीटरचा वाहतूक खर्च, हमाली याचा विचार करता १० टक्‍के जास्त मिळूनही उपयोग झाला नसता. 
- दिलीप पाटील, शेतकरी, जरंडी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
 

नागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श सांगणाऱ्या जरंडी (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांना उत्पादनानंतर मात्र विक्रीसाठी जंगजंग पछाडावे लागल्याने पांढरे सोने काळवंडले. परिणामी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस बाजार दराने जामनरेच्या व्यापाऱ्याला कापूस विकून आपली देणी भागविली. राज्याला दिशा देणारा हा पहिलावहिला प्रयोगच फसल्याने यामुळे शासनाच्या धोरणावरही साशंकता व्यक्‍त केली जात आहे. 

एक गाव एक वाण या विषयावर ९ एप्रिल २०१८ जिनर्स असोसिएशनच्या बैठकीत मंथन झाले. एकच वाण असेल तर बाजार दरापेक्षा १० टक्‍के जास्त परताव्यावर बैठकीत चर्चा झाली. मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी गावाने या दिशादर्शक उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली. जरंडीचे दिलीप आणि गोपाल पाटील यांच्या नेतृत्वात ४० शेतकऱ्यांनी या महत्त्वाकांक्षी आणि राज्याला दिशादर्शक असा उपक्रमात सहभागी होण्याचा ठरविले. त्यानुसार एक गाव एक वाणअंतर्गत ३०० एकरांवर लागवड करण्यात आली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अकोला कृषी विद्यापीठात राज्यभरातील जिनर्सच्या झालेल्या बैठकीत जरंडी गावातील शेतकऱ्यांच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले. या बैठकीला जरंडीचे शेतकरी दिलीप पाटील व इतरांनाही निमंत्रित करण्यात आले होते. 

कापसाच्या विक्रीपूर्वी ज्येष्ठ कापूसतज्ज्ञ गोविंद वैराळे यांच्या पुढाकाराने नागपुरातील सिरकॉट संस्थेत जरंडी गावात उत्पादित कापसातील रुईचे प्रमाण तपासण्यात आले. सहा ऑक्‍टोबरला दहा नमुने तपासले गेले. जानेवारीत पुन्हा कापूस नमुन्यांची तपासणी एरंडोल, धरणगाव, सिल्लोड येथे करण्यात आली. कापसात क्‍विंटलला ३४ किलो रुई, ६४ किलो सरकी, २ किलो वेस्ट असे सरासरी प्रमाण राहते. परंतु जरंडी गावातील कापसात सर्वाधिक ३७ ते ३९ किलो रुईचे प्रमाण मिळून आले, असे असतानाही जिनिंग व्यावसायिकांकडून येथील शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. हंगाम संपत आला असतानाही दहा टक्‍के वाढीव दर मिळत नसल्याचे पाहून संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस ६२०० रुपये क्‍विंटल दराने जामनेर येथील व्यापाऱ्याला २००० क्‍विंटल कापसाची विक्री केली. या संदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. 

असे आहे जरंडी
जरंडी गाव कापूस उत्पादनासाठी ओळखले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने ९९ टक्‍के शेतकरी ठिबकवरच कापसाचे उत्पादन घेतात. कापसाची सरासरी उत्पादकता १२ क्‍विंटलची राहते. या वर्षी पाण्याची जेमतेम उपलब्धता असल्याने ही उत्पादकता एकरी आठ ते नऊ क्‍विंटलवर आली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...