agriculture news in Marathi one year boy and 90 year old man recover from corona Maharashtra | Agrowon

वर्षाचे बाळ अन् नव्वदीचे आजोबा झाले कोरोनामुक्त 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

नव्वद वर्षाचे आजोबा आणि एका एक वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. या दोघांच्या कोरोनामुक्तीमुळे सगळ्यांनाच त्याचं अप्रूप आणि आनंदही वाटतो आहे. 

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल) कोरोना विलगीकरण कक्षातून आतापर्यंत २९ रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे आजोबा आणि एका एक वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. या दोघांच्या कोरोनामुक्तीमुळे सगळ्यांनाच त्याचं अप्रूप आणि आनंदही वाटतो आहे. 

रुग्णालायचे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्षप्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलगीकरण कक्षात एकूण १०३ रुग्ण भरती झाले होते. त्यातील २९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या २९ जणांत एक रुग्ण तब्बल ९० वर्षाचे होते, तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते. मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे. 

एका रुग्णास न्युमोनिया होता, तसेच मुत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोविड आयसीयू मध्येच डायालिसिस करण्यात आले. त्यांच्या न्यूमोनियाही बरा झाला. उर्वरित २६ रुग्णांपैकी सात लोकांना न्यूमोनिया होता. पाच लोकांना घसा दुखीचा त्रास होता. उर्वरित १४ लोकांना कोरोना बाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि हृदयविकार आदी त्रास होते. मात्र त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले. 

सर्वाधिक लक्षवेधले ते नव्वदीतील आजोबा आणि अवघ्या वर्षाच्या बाळाने या दोघांनी यावरील उपचाराला योग्य तो प्रतिसाद दिला, वैद्यकीय पथकालाही त्यांच्या प्रतिसादाने उत्साह वाढला आणि बघता बघता हे दोघेही नीट होऊन आता आपल्या घरी गेले, याचे समाधान काही वेगळेच होते, असेही डॉ. प्रसाद म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...