बामणीत सापडला पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृतदेह

बामणीत सापडला पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृतदेह
बामणीत सापडला पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृतदेह

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणा-या बामणी येथील एका शेतात पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. आज (ता.१३) सकाळी हा प्रकार समोर आला. या माहितीनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

दरम्यान, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या चार माहिन्यात या परिसरात अशापध्दतीने तीन वाघांचे बळी गेल्याची माहिती आहे. कोठारी वनपरिक्षेत्रातील बामणी शेतात पट्टेदार वाघाचा एक वर्षाचा बछाडा पुंडलिक मडावी यांच्या शेतात जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सकाळी साधारण नऊच्या सुमारास मडावी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात भाजीपाला पिकाची पाहणी करण्याकरिता गेले असता वांग्याच्या पिकात वाघाचा बछडा जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसताच त्यांनी घाबरून गावात धूम ठोकली आणि गावकऱ्यांना माहिती दिली. गावातील लोक जमा होऊन प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनरक्षक टेकाम यांना जखमी अवस्थेतील वाघाची माहिती दिली. श्री. टेकाम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी वाघावर जाळी टाकून त्यास संरक्षण दिले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवे, परंतू वनविभागाचे पथक पोचण्यापर्यंत वाघाचा हा बछडा मृत्यू पावला होता. मृत वाघास ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले.

घटनास्थळी चंद्रपूर वनक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामा राव, डीएफओ गजेंद्र हिरे, आरएफओ संदीप लंगडे, आरएफओ दिलीप बावणे यांच्या सह अनेक वनकर्मचारी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com