Agriculture news in Marathi Onerous terms for pomegranate insurance | Page 2 ||| Agrowon

डाळिंब विम्यासाठी जाचक अटी

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

केंद्र आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेच्या लाभापासून विमा कंपनीने बदललेले निकष आणि जाचक अटीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी नुकसान होत आहे. त्यामुळे ते विम्यापासून वंचित राहणार आहेत.

आटपाडी, जि. सांगली ः केंद्र आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेच्या लाभापासून विमा कंपनीने बदललेले निकष आणि जाचक अटीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी नुकसान होत आहे. त्यामुळे ते विम्यापासून वंचित राहणार आहेत. जाचक अटी आणि निकष तातडीने बदलून डाळिंब तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते ठरवावेत, अशी मागणी होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे ‘पंतप्रधान पीक विमा’ योजना शेतकऱ्यासाठी राबवते. पाच टक्के विमा हप्ता रक्कम शेतकरी तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपन्याकडे जमा करतात. फळबाग विमा योजना पुनर्रचित हवामानावर आधारित आहे. यामध्ये प्रामुख्याने पाऊस, तापमान आणि आद्रता तसेच वादळ, गारपीट यावर आधारित भरपाई ठरवली जाते. मात्र, या वर्षीपासून विमा कंपनीने निकषात मोठे बदल करून जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे नुकसान होऊन ही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. सलग पाच किंवा त्यापेक्षा जास्त दिवस रोज पंचवीस मिलिमीटर पाऊस आणि ८० टक्केवर आद्रता राहिल्यास ठरावीक रकमेला पात्र राहणार आहेत. यापूर्वीचे निकष वेगळे
होते.

सलग पाच दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणे कठीण आहे. मुळात डाळिंब उष्ण, कोरड्या आणि कमी पावसाच्या भागातील पीक आहे. डाळिंबाला जराही जादा पाऊस आणि आद्रता चालत नाही. सलग दोन-तीन दिवस पाऊस, जास्त आद्रता आणि ढगाळ हवामान राहिले तर प्रचंड मोठे नुकसान होते. मात्र, विमा कंपनीने याहीपेक्षा प्रचंड जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा ही जादा पाऊस आणि नुकसान होऊनही शेतकरी विमा भरपाई पासून वंचित राहणार आहेत.

विमा कंपन्यांनी अत्यंत जाचक अटी आणि नियम केल्यामुळे प्रचंड नुकसान होऊनही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपनीचे हे षडयंत्र असून डाळिंब तज्ञाकडून विमाभरपाईचे निकष ठरवले जावेत.
- आनंदराव पाटील, संचालक, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...