agriculture news in Marathi Onion on 11 thousand in Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २५) कांद्याच्या भावाने आणखी उसळी घेतली. गेल्या आठवड्यात नऊ हजारांवर गेलेला कांदा सोमवारी थेट ११ हजार रुपयांवर पोचला. बाजार समितीत यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. 

सोमवारी बाजार समितीमध्ये २० हजार २५६ क्विंटल म्हणजे जवळपास २०५ ट्रक कांद्याच्या गाड्यांची आवक झाली. या आधी बाजार समितीमध्ये २१ नोव्हेंबरला आठ हजार आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी २२ नोव्हेंबरला नऊ हजार, २३ नोव्हेंबरला नऊ हजार ६०० रुपयांपर्यंत कांद्याचा भाव गेला होता.

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २५) कांद्याच्या भावाने आणखी उसळी घेतली. गेल्या आठवड्यात नऊ हजारांवर गेलेला कांदा सोमवारी थेट ११ हजार रुपयांवर पोचला. बाजार समितीत यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. 

सोमवारी बाजार समितीमध्ये २० हजार २५६ क्विंटल म्हणजे जवळपास २०५ ट्रक कांद्याच्या गाड्यांची आवक झाली. या आधी बाजार समितीमध्ये २१ नोव्हेंबरला आठ हजार आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी २२ नोव्हेंबरला नऊ हजार, २३ नोव्हेंबरला नऊ हजार ६०० रुपयांपर्यंत कांद्याचा भाव गेला होता.

रविवारी बाजाराला सुटी होती. त्यामुळे आज पुन्हा सलग चौथ्या दिवशी कांद्याच्या भावाने उच्चांक करत ११ हजारांचा टप्पा पार केला. सोलापूर बाजार समितीमध्ये यंदा सर्वाधिक १८० ट्रक गाड्यांची आवक झाली होती. आज त्यामध्येही वाढ होऊन गाड्यांची संख्या २०५ वर गेली आहे. यापूर्वी तीन हजार २०० रुपयांचा असलेला सरासरी दरही आता तीन हजार ८०० रुपयांवर पोचला आहे, असे असले तरी कांद्याची ही आवक स्थानिक भागातून कमीच आहे.

सध्याची आवक प्रामुख्याने बाहेरील जिल्ह्यातून आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कांदा ५०० ते ७०० रुपये क्विंटल दराने खरेदी होत होता. यंदा मात्र चित्र काहीसे बदलल्याचे दिसते. 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १५० ते ६०००...नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत बटाट्यास १५०० ते २२०० रुपये सांगली : विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात...
जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १...
नगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा कायम नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगर जिल्ह्यात कांदा साडेपाच हजारांवर...नगर ः गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे...
पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कापूस दर ५१०० रुपये...जळगाव  ः शासकीय खरेदी बऱ्यापैकी सुरू...