Agriculture news in marathi, onion is 1600 to 4000 rupees per quintal in Sangli | Agrowon

सांगलीत कांदा १६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १७३७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १६०० ते ४००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक हळदीची ३८७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६००० ते ६७००, तर सरासरी ६३५० रुपये असा दर होता. गुळाची १६३८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति क्विंटल ३२०० ते ३८९०, तर सरासरी ३५४५ रुपये असा दर मिळाला. 

सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १७३७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १६०० ते ४००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक हळदीची ३८७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६००० ते ६७००, तर सरासरी ६३५० रुपये असा दर होता. गुळाची १६३८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति क्विंटल ३२०० ते ३८९०, तर सरासरी ३५४५ रुपये असा दर मिळाला. 

दुय्यम बाजार आवारात बटाट्याची ११८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२० ते ८५० रुपये असा दर मिळाला. लसणाची ३१६ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १०,००० ते १२,००० रुपये असा दर होता. डाळिंबाची ५४२० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

सीताफळाची २५५० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १०० ते ६०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ५८३८ पेटीची आवक झाली. त्यास प्रतिपेटीस १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची ४७०० डझनाची आवक झाली. मोसंबीला प्रति दहा किलोस ३०० ते ७०० रुपये असा दर होता. आल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये असा दर मिळाला.

शिवाजी भाजी मंडईत पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. कोथिंबिरीची ८००० पेंड्याची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये असा दर होता. पालकाची १५०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकडा ३०० ते ४०० रुपये शेकडा असा दर मिळाला. मेथीची २००० पेंड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. वांग्याची ४० बॉक्स आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. दोडक्याला २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. 


इतर बाजारभाव बातम्या
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...