सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये प्रतिक्विंटल

onion 3500 to 10111 rupees per quintal in Sangli
onion 3500 to 10111 rupees per quintal in Sangli

सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची बुधवारी (ता. ११) ४८७७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते १०,१११ असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बटाट्याची १२७५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये असा दर होता. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते १० हजार रुपये असा दर मिळाला. बोरांची २१० क्विंटल आवक झाली. त्यांना २००० ते २० हजार असा दर होता. संत्र्यांची १०७०० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस २५० ते ४०० रुपये असा दर होता. डाळिंबांची १६०२० डझनाची आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस २०० ते ६०० असा दर मिळाला. सफरचंदाची  ६१६ पेटीची आवक झाली असून त्यास प्रति पेटीस ५०० ते १००० असा दर होता.

गुळाची ७९७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ३८६० रुपये असा दर होता. ज्वारी (हायब्रीड)ची ५० क्विंटल आवक झाली होती. तिला प्रति क्विंटल २५५० ते ३६०० रुपये असा दर मिळाला. गव्हाची १५० क्विंटल आवक झाली. त्यास २४०० ते ३००० असा दर होता. ज्वारीची (शाळू) ८० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ३४०० ते ४५०० रुपये असा दर मिळाला. तांदळाची ३४० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रति क्विंटल २४०० ते ७८०० रुपये असा दर होता.

मेथीची ३५०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकडा ५०० ते ६०० रुपये असा दर होता. कोथिंबिरीची ८ हजार पेंड्यांची आवक झाली. तिला प्रति शेकडा ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला. पालकाची १५०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकडा ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. वांग्यांची १५० बॉक्सची आवक झाली. वांग्यांना प्रति दहा किलोस १५० ते २५० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची १५० बॉक्सची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता. 

टोमॅटोचा १२०० क्रेटची आवक झाली होती.  त्यांना प्रतिदहा किलोस ५० ते १०० असा दर होता. दोडक्याची ८० बॉक्सची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. कारल्याची ५० बॉक्सची आवक झाली होती. कारल्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com