कोल्हापुरात कांदा प्रतिदहा किलो ५०० ते १५०० रुपये

 Onion 500 to 1500 per ten kg in Kolhapur
Onion 500 to 1500 per ten kg in Kolhapur

कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता.१७) कांद्याची पाच हजार पोती आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५०० ते १५०० रुपये दर मिळाला. इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याचे दर कोल्हापूर बाजार समितीत जास्त आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बाजार समितीत नगर, पुणे जिल्ह्यातून कांदा येत असतो. दर वाढल्याने राज्यातील इतर भागातूनही कांद्याची आवक सुरू झाली आहे. सध्या सोलापूर, बार्शी, भागातूनही बाजार समितीत कांदा येत असल्याची माहिती समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीत दररोज चार ते पाच हजार पोती कांद्याची आवक झाली. बटाट्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे. बुधवारी (ता.१८) बटाट्याची ८९२ पोती आवक झाली. त्यांना दहा किलोस १४० ते २४० रुपये दर मिळाला. गेल्या पंधरवड्यापासून बटाट्याच्या दरातही वाढ होत आहे. 

स्थानिक ठिकाणी बटाट्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने येत्या महिनाभरात नवीन बटाटा येईपर्यंत बटाट्याचे दर चढेच रहातील, असा अंदाज कांदा बटाटा बाजारातील सूत्रांनी वर्तविला. लसणाची २१५ आवक झाली. त्यास दहा किलोस ८०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

भाजीपाल्यांमध्ये वांग्यांची ३४६ करंड्या आवक झाली. त्यांना दहा किलोस १०० ते २५० रुपये दर होता. कोबीची २६० पोती आवक झाली. तिला दहा किलोस १०० ते १५० रुपये दर होता. टोमॅटोची वाढलेली आवक कायम आहे. टोमॅटोची १२७० रुपये आवक झाली. त्यांना दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची  ५९६ पोती आवक झाली. तिला दहा किलोस १०० ते २८० रुपये दर मिळाला. 

भेंडीची दीडशे दोनशे करंड्या आवक होती. तिला दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची २५८०० पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com