नगरमध्ये ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड  

Onion area is cultivated on an area of ​​52,000 hectares
Onion area is cultivated on an area of ​​52,000 hectares

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये परतीचा झालेल्या पावसामुळे पाणी उपलब्ध झाल्याने रब्बीत कांदा लागवडीला बऱ्यापैकी फायदा झाला आहे. यंदा रब्बी हंगामात आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये ५२ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर काद्याची लागवड झाली आहे. यंदा कांद्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तहीरी अजून चार तालुक्यांत कांद्याची लागवड झाली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात दिसत आहे.  

नगर जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे यंदाही काही प्रमाणात खरिपाच्या पिकांवर परिणाम झाला. कांद्याची लागवडही फारसी झाली झाली नाही. मात्र, आॅक्टोबर महिन्यात सलग महिनाभर झालेल्या पावसामुळे मात्र बहुतांश भागात पाणी उपलब्ध झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांना झाला असून, रब्बीत कांदा लागवड जोरात सुरू झाली आहे. यंदा गेल्यावर्षीचा दुष्काळ आणि खरिपात फारसा कांदा निघाला नसल्याने बाजारात कांदा उपलब्ध नाही. 

खरिपातील काही प्रमाणात कांद्याचे पावसाने नुकसानही झाले आहे. त्यामुळे सध्या कांद्याला चांगला दर आहे. शिवाय भविष्यातही कांद्याची टंचाई निर्माण होणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्यामुळे यंदा रब्बीत नगर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कांदा लागवड होणार असल्याचे दिसत आहे. 

राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यात कांद्याची अजून लागवड झालेली नाही. अकोल्यातही अगदी नगण्य लागवड आहे. तरीही दहा तालुक्यातच आतापर्यंत ५२ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अजूनही लागवड सुरू आहे, त्यामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com