कांदा उत्पादकांची सावध चाल 

केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आवकेवर मोठा परिणाम झाला आहे.
Onion
Onion

नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. याचा फटका प्रामुख्याने कांदा उत्पादकांना बसत असून साठवलेला कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कामकाज अस्थिर झाल्याचे चित्र आहे. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर दरात १ हजार ते ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये होणारी कांद्याची आवक कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. मात्र दरम्यानच्या काळात काढणीच्या अवस्थेत झालेले नुकसान हा प्रमुख अडचणीचा मुद्दा आहे. अलीकडेच दरात उत्पादन खर्चाची पडतळ बसायला सुरुवात झाली. 

मात्र निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या थेट मुळावरच आला. त्यामुळे शेतकऱ्यांनाही सावध भूमिका घेत कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याचे धोरण राबवण्याचा या निमित्ताने पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.यातच सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने जिल्ह्यातील बाजार समित्या गुरुवार(ता.१७) बंद होत्या. त्यातच शुक्रवार(ता.१८) बाजार समित्या सुरू असल्या तरी त्याचा परिणाम आजही पाहायला मिळाला.  जिल्ह्यात घटलेली आवक स्थिती(क्विंंटल)

बाजार समिती १४ सप्टेंबर १५ सप्टेंबर १६ सप्टेंबर 
पिंपळगाव बसवंत १९२९२ २२१९२ १५४२३ 
लासलगाव १५३६८ ७२ ९०४४ 
सटाणा १६२८० ११३२० १८१६० 
उमराणे १८७६७ १५१५१ १०२३२ 
येवला ८५१२ बंद ३०६१ 
सिन्नर ८४२३ ३०९३ ४१९६ 
मनमाड ४५७७ ३५२० १५००   

प्रतिक्रिया  निर्यातबंदीमुळे व्यवहार कमी होत आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी थांबले होते. निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर अधिक मिळतो असे नाही. मात्र तुलनात्मक विचार केल्यास अगोदर विक्री व सध्या होत असलेली विक्री यात मोठी तफावत असल्याने मिळणारा दरही समाधानकारक नाही.  - बाळासाहेब बाजारे, सचिव-कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

कांदा मोठ्या प्रमाणावर सडू लागला आहे. त्यामुळे या निर्यातबंदीमुळे अडचण वाढली आहे. भाव नसल्याने आता टप्प्याटप्प्याने विकण्याचा निर्णय घेतला आहे. नफा तर नाही मात्र केलेला खर्च वसूल व्हायला हवा, सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे.  -दादासाहेब पाटील, कांदा उत्पादक, पाळे खुर्द, ता. कळवण   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com