Agriculture news in Marathi, Onion arrives in Nashik; Increase in rates | Agrowon

नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९६७५ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ३५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत घट झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९६७५ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ३५०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत घट झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात वालपापडी घेवड्याची आवक ५३३९ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० दर मिळाला. तर घेवड्याला ५५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. या सप्ताहात वालपापडी घेवड्याची आवक कमी झाल्याने मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक ११०१ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. 

लवंगी मिरचीला २००० ते ३०००, तर ज्वाला मिरचीला १२०० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वाटाण्याची आवक ७६९ क्विंटल झाली. वाटण्याची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली. त्यास ६५०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची आवक ७३९३ क्विंटल झाली. बाजारभाव ८५० ते १२०० प्रतिक्विंटल होते.

लसणाची आवक १५८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आद्रकची आवक १८० क्विंटल झाली. त्यास १४५०० ते १७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावातसुद्धा चढउतार दिसून आली. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते ३००, वांगी २०० ते ५००, फ्लॉवर १३५ ते ३१० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते २०० असा प्रति २० किलोस दर मिळाला.

ढोबळी मिरची १६० ते ३०० असे प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ७० ते १५०, कारले १०५ ते २५०, गिलके १७५ ते ३००, भेंडी १८० ते ३०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला १०० ते ३००, लिंबू  ४०० ते ९००, दोडका १२५ ते ३०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ६०० ते ३५००, मेथी ८०० ते २३००, शेपू ११०० ते ३०००, कांदापात ११०० ते २१००, पालक २१० ते ३५०, पुदिना ९० ते २०० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले.  

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ७५२३ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून, परपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी आवकेच्या तुलनेत वाढ झाली असून, बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ४५०० व मृदुला वाणास ५०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक ६०५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...