agriculture news in marathi, Onion auction closed due to Modi's meeting | Agrowon

मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी (ता. २२) कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या पडीक जमिनीवर झाली. या दरम्यान सुरक्षा व वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन बाजार समितीत कांदा लिलाव शासनाच्या आदेशाने बंद ठेवण्यात आले. त्यामुळे कांदा उत्पादकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. 

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी (ता. २२) कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या पडीक जमिनीवर झाली. या दरम्यान सुरक्षा व वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन बाजार समितीत कांदा लिलाव शासनाच्या आदेशाने बंद ठेवण्यात आले. त्यामुळे कांदा उत्पादकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. 

कसमादे पट्ट्यात यावर्षी अधिक प्रमाणावर कांदा लागवड झाली. कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मागील आठवड्यात १९०० वाहनांपर्यंत आवक झाली होती. मात्र, मंगळवारी (ता. २३) बाजारात १५०० च्या आसपास वाहने आली. त्यामुळे दैनंदिन आवकेत घट होणार आहे. 

कांद्याच्या मुख्य हंगामातही अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव शनिवारी, अमावास्येला बंद असतात. मागील आठवड्यात रामनवमी या शासकीय सुटच्या दिवशीसुद्धा कामकाज चालू ठेवण्यात आले होते. मात्र, सभेमुळे समितीचे कामकाज बंद होते. त्यामुळे आवकेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

जिल्ह्यातील देवळा, बागलाण, कळवण, चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांना हे मार्केट सोयीचे व मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या बाजार समितीला शेतकऱ्यांची पसंती आहे. मात्र, सभेचा फटका कामकाजावर बसला आहे. सध्या बाजारभाव ५०० ते ११६७ प्रतिक्विंटल असून सरासरी बाजारभाव ९५० आहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...