नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज दिवाळीपूर्वीच २८ ऑक्टोबरनंतर बंद होते, १२ दिवसांनंतर ते पुन्हा सुरू झाले. मात्र उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण होत असल्याचे चित्र आहे.
Onion_1.jpg
Onion_1.jpg

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज दिवाळीपूर्वीच २८ ऑक्टोबरनंतर बंद होते, १२ दिवसांनंतर ते पुन्हा सुरू झाले. मात्र उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण होत असल्याचे चित्र आहे. कांद्याचा तुटवडा असल्याने दिवाळीनंतर मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अधिक दिवस बाजार समित्या बंद असल्याने आवक वाढून दरात घसरण होण्याची भीती होती. मात्र सध्या खरीप लाल कांद्याची आवक तुलनेने कमी होत असल्याने व उन्हाळी कांद्याचा साठा कमी झाल्याने कांद्याला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नाशिकचा उन्हाळ कांदा हा दरात स्थिर राहील याचे बाजार समितीच्या कामकाजात दिसून आले. दिवाळीअगोदर सरासरी दर २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ दिसून आली.

दिवाळीनंतर बंद असलेल्या बाजार समित्याचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र येत्या पुढील आठवड्यात सोमवारनंतर कामकाज सुरळीत होण्याची स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात कामकाज सुरू झाले असले तरी दुसऱ्या दिवशी मात्र १०० रूपयांनी क्विंटलमागे घसरण झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांनी दरात फटका बसू नये म्हणून काळजी घेत टप्प्याटप्प्याने माल विक्रीस आणत आहेत. प्रतवारी करून कांदा साठवणूक करून नियोजन केले. त्यामुळे मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहेत.

चांदवड बाजार समितीचे कामकाज बुधवार (ता.१०)पासून सुरू झाले. तर येवला बाजार समितीचे कामकाज व्यापारी अर्जावरून बंदच असल्याने शेतकऱ्यांनी कामकाजाचा निषेध केला आहे. तर उपबाजार अंदरसूल आवार सुरू होता. माथाडी व व्यापारी यांच्यात झालेल्या वादामुळे पिंपळगाव बाजार समिती आवारात कामकाज बंद राहिले. जिल्ह्यातील सरासरी दर स्थिती (रुपया / प्रतिक्विंटल)

बाजार समिती ९ नोव्हेंबर. १० नोव्हेंबर
लासलगाव. २९०० २८००
पिंपळगाव बसवंत ३००० बंद
सटाणा २६७५. २९५०
मनमाड. २७०० २६००
सिन्नर २७०० २६००
देवळा २८००. २८००

प्रतिक्रिया: गेल्या आठवड्यात बाजार समित्या बंद होत्या. महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील आवार सोमवारपासून सुरळीत सुरू होतील. त्यामुळे सोमवारनंतर कांदा दराचे चित्र स्पष्ट होईल. - खंडू काका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन कांद्याच्या प्रतवारीनुसार कांदा दराची गणित ठरत आहेत. दिवाळी पूर्वीच्या बाजाराच्या तुलनेत सध्या दरात दरात सुधारणा झाली आहे. दिवाळी दरम्यान बाजार समित्या बंद राहिल्याने आता उठाव आहे. - मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार दिवाळीनंतर दरात सुधारणा दिसून आली. जसा माल तसा भाव मिळत आहे.मागणी वाढल्याने दरात फायदा होतोय. माल नियोजन करून विकण्यास प्राधान्य देणार आहोत. - सचिन कडलग, गुंजाळवाडी, ता. निफाड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com