agriculture news in marathi Onion auction starts in Nashik District APMC after Diwali Holidays | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज दिवाळीपूर्वीच २८ ऑक्टोबरनंतर बंद होते, १२ दिवसांनंतर ते पुन्हा सुरू झाले. मात्र उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण होत असल्याचे चित्र आहे.

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज दिवाळीपूर्वीच २८ ऑक्टोबरनंतर बंद होते, १२ दिवसांनंतर ते पुन्हा सुरू झाले. मात्र उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण होत असल्याचे चित्र आहे. कांद्याचा तुटवडा असल्याने दिवाळीनंतर मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात अधिक दिवस बाजार समित्या बंद असल्याने आवक वाढून दरात घसरण होण्याची भीती होती. मात्र सध्या खरीप लाल कांद्याची आवक तुलनेने कमी होत असल्याने व उन्हाळी कांद्याचा साठा कमी झाल्याने कांद्याला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नाशिकचा उन्हाळ कांदा हा दरात स्थिर राहील याचे बाजार समितीच्या कामकाजात दिसून आले. दिवाळीअगोदर सरासरी दर २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ दिसून आली.

दिवाळीनंतर बंद असलेल्या बाजार समित्याचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र येत्या पुढील आठवड्यात सोमवारनंतर कामकाज सुरळीत होण्याची स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात कामकाज सुरू झाले असले तरी दुसऱ्या दिवशी मात्र १०० रूपयांनी क्विंटलमागे घसरण झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांनी दरात फटका बसू नये म्हणून काळजी घेत टप्प्याटप्प्याने माल विक्रीस आणत आहेत. प्रतवारी करून कांदा साठवणूक करून नियोजन केले. त्यामुळे मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहेत.

चांदवड बाजार समितीचे कामकाज बुधवार (ता.१०)पासून सुरू झाले. तर येवला बाजार समितीचे कामकाज व्यापारी अर्जावरून बंदच असल्याने शेतकऱ्यांनी कामकाजाचा निषेध केला आहे. तर उपबाजार अंदरसूल आवार सुरू होता. माथाडी व व्यापारी यांच्यात झालेल्या वादामुळे पिंपळगाव बाजार समिती आवारात कामकाज बंद राहिले.

जिल्ह्यातील सरासरी दर स्थिती (रुपया / प्रतिक्विंटल)

बाजार समिती ९ नोव्हेंबर. १० नोव्हेंबर
लासलगाव. २९०० २८००
पिंपळगाव बसवंत ३००० बंद
सटाणा २६७५. २९५०
मनमाड. २७०० २६००
सिन्नर २७०० २६००
देवळा २८००. २८००

प्रतिक्रिया:
गेल्या आठवड्यात बाजार समित्या बंद होत्या. महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील आवार सोमवारपासून सुरळीत सुरू होतील. त्यामुळे सोमवारनंतर कांदा दराचे चित्र स्पष्ट होईल.
- खंडू काका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन

कांद्याच्या प्रतवारीनुसार कांदा दराची गणित ठरत आहेत. दिवाळी पूर्वीच्या बाजाराच्या तुलनेत सध्या दरात दरात सुधारणा झाली आहे. दिवाळी दरम्यान बाजार समित्या बंद राहिल्याने आता उठाव आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार

दिवाळीनंतर दरात सुधारणा दिसून आली. जसा माल तसा भाव मिळत आहे.मागणी वाढल्याने दरात फायदा होतोय. माल नियोजन करून विकण्यास प्राधान्य देणार आहोत.
- सचिन कडलग, गुंजाळवाडी, ता. निफाड 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...