नगरला कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू
नगरला कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू

नगरला कांद्याचे लिलाव सुरळीत

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ता बाजार उपबाजारात गुरूवारी (ता. १०) कांद्याचे लिलाव सुरळीत झाले. येथे दिवसभरात नेहमीच्या तुलनेत आवक कमी होती. कांदा निर्यात थांबवण्यासाठी व्यापारी व शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. ७) कांदा आंदोलन पुकारले होते. त्या पाश्वभूमीवर लिलाव होतील की नाही याबाबत शंका होती. 

देशात कांद्याला चांगले दर मिळू लागल्याने कांदा महागला म्हणून शासनाने कांदा निर्यातबंदी केली. व्यापाऱ्यांनाही कांदा साठवणीला निर्बंध आणले. त्याचा परिणाम कांदा बाजारावर झाला आहे. नगरसह राज्यातून परराज्यांत जाणारा कांदा राज्याच्या सीमेवर अडवला जात आहे. याशिवाय त्या त्या राज्यात साठवलेला कांदा प्रशासन धाडी घालून जप्त करत आहे. 

याशिवाय परदेशांतील कांद्याची निर्यात बंद असल्याने कांद्याला उठाव नाही. त्यामुळे नगरसह महाराष्ट्रातून घेतलेला कांदा ठेवायचा कुठे, शिवाय सरकार जर तो ताब्यात घेणार असेल तर पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत. त्यामुळे सोमवारपासून व्यापाऱ्यांनी कांदा सत्याग्रह आंदोलन पुकारले असून, त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता. हे आंदोलन बेमुदत असल्याचे सांगण्यात आले होते. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात नगरसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद व अन्य भागातून कांदा विक्री साठी येत असतो. 

आंदोलनाच्या पाश्वभूमीवर गुरुवारी कांदा लिलाव होतील की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आज कुठल्याही अडथळ्याविना कांद्याचे लिलाव झाले. सकाळी नेहमीप्रमाणे लिलावाला सुरवात झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com