agriculture news in marathi Onion in Aurangabad averages Rs 3500 | Agrowon

औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२४) कांद्याची १५०० क्‍विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ५५०० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२४) कांद्याची १५०० क्‍विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ५५०० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५५ क्विंटल आवक झाली. तिला सरासरी ४२५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २८ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टोमॅटोची आवक १०४ क्विंटल, तर सरासरी दर १९०० रुपये राहिला. २५ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना सरासरी ११५० रुपये दर मिळाला.

गवारीची आवक तीन क्विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिले. २८ क्विंटल आवक झालेल्या काकडीला सरासरी १३०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक ८ क्विंटल, तर सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३६ क्विंटल आवक झालेल्या कोबीला सरासरी ३००० रुपये दर मिळाला. 

लिंबांची आवक ४२ क्विंटल, तर दर १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला प्रतिशेकडा सरासरी ६०० रुपये दर मिळाला. पालकाची आवक १३००० जुड्या झाली. त्यास सरासरी ४५० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. २२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे सरासरी दर ३५० रुपये प्रतिशेकडा राहिले. शेवग्याची आवक १० क्विंटल, तर सरासरी दर ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. चार क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला सरासरी ७०० रुपये दर मिळाला.

ढोबळ्या मिरचीची आवक तीन क्विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला. तीन क्विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी २७५० रुपये दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या मक्याला सरासरी १२०० रुपये दर मिळाला. 

मोसंबीची आवक ५७ क्विंटल, तर सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. पस्तीस क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला २५०० रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला. पेरूची आवाक १२ क्विंटल, तर सरासरी दर १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २९७ क्विंटल आवक झालेल्या झेंडू फुलांना सरासरी ६५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला.

संत्री १००० रूपये क्विंटल

संत्र्यांची आवक २६ क्विंटल झाली. त्यास सरासरी १००० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. ५०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्यांना सरासरी दर ३१५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ५५ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला सरासरी ३७०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...