औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१९) कांद्याची ६२७ क्विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते २३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
 Onion in Aurangabad costs 300 to 2300 rupees
Onion in Aurangabad costs 300 to 2300 rupees

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१९) कांद्याची ६२७ क्विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते २३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५९ क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ४२ क्विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १७० क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वांग्यांची आवक ४४ क्विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २५०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. काकडीची आवक ५१ क्विंटल, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. 

कोबीची आवक ८६ क्विंटल, तर दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २९ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला ७०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. चार क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. दुधी भोपळ्याची आवक २२ क्विंटल, तर दर ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक १६ क्विंटल, तर दर २००० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या चवळीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. 

कारले २००० ते २५०० रूपये

वालशेंगांची आवक ४ क्विंटल, तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक ५५ क्विंटल, तर दर ७०० ते १००० रुपये प्रति क्विंटल राहिले. २८ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० रुपये ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ११३ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com