Agriculture news in marathi Onion in Aurangabad costs Rs. 200 to 3200 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला २०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला २०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ६७ क्विंटल आवक झाली. तिला २००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३१ क्विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११६ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. १४ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. गवारची आवक ५ क्विंटल, तर दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १९ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक ३६ क्विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

कोबीची आवक ६३ क्विंटल, तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या लिंबांना १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शेवग्याची आवक २० क्विंटल, तर दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या पपईला ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक १२ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये राहिला. १६ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कारल्याची आवक २० क्विंटल, तर दर २२०० ते ३००० रुपये राहिले. ३४ क्विंटल आवक झालेल्या मक्याला १००० ते १२०० रुपये दर मिळाला. 

मोसंबीची आवक ५२ क्विंटल, तर दर १५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ६१ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ५०००  रुपये दर मिळाला. पेरूची आवक १६ क्विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २२ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या डांगरला ४००  ते ६०० रुपये दर मिळाला. सीताफळांची आवक ३७ क्विंटल, तर दर २००० ते ३५०० रुपये राहिले. 

भुईमूग शेंगांना २५०० ते ३५०० रूपये 

भुईमूग शेंगांची आवक ५५ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची आवक ८०० क्विंटल, तर २३०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १२२०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ४०० ते ६०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला. पालकाची आवक ११००० जुड्या, तर दर २०० ते २५० रुपये प्रतिशेकडा राहिले. कोथंबीरची आवक १३५०० जुड्या, तर दर ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकडा राहिले.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...