Agriculture news in marathi Onion B defective Fraud of farmers | Page 3 ||| Agrowon

सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

खासगी कृषी फार्म, व्यापारी तसेच काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कांदा बी सदोष निघाल्याने उत्तर खटावमधील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी तसेच काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कांदा बी सदोष निघाल्याने उत्तर खटावमधील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या कांदा बी पासून तयार केलेल्या रोपांची लागवड केलेल्या कांदा पिकाला संपूर्ण नळे निघाले असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच या कांदा पिकाचा रंगही एकसारखा नसल्याने मालाचा दर्जा घसरला असून, विक्रीअभावी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसाने या भागातील लागवडीसाठी तयार केलेली कांदा रोपे वाया गेली होती. त्यामुळे टंचाई निर्माण होऊन कांदा बी चढ्या दराने विकले जात होते. 

लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी हातउसने किंवा कर्जाऊ रक्कम काढत कांदा बी खरेदी केले व त्याची रोपे तयार करून लागवड केली आहे. उत्तर खटावमधील जवळपास शेकडो शेतकऱ्यांनी मिळेल त्याच्याकडून मिळेल त्या दरात लाखो रुपयांचे कांदा बी खरेदी केले. कांदा बी शेतात टाकून नंतर रोप तयार केल्यानंतर डिसेंबर महिन्यात लागवड देखील केली.

कांदा लागवडीपर्यंत उत्तम प्रत असलेल्या रोपांना आजमितीस संपूर्ण नळे आले असून, पिकाचा रंग ही वेगवेगळा असल्याचे दिसत आहे. सदोष कांदा बियाणांमुळे कांदा उत्पादनात घट निर्माण झाली असून, संपूर्ण रब्बी हंगाम वाया गेला असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. 

संबंधित विक्रेत्यांना प्रत्यक्षात शेताच्या बांधावर बोलवत पीक पाहणी करण्याची विनंती केली असता विक्रेते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भविष्यात शेतकऱ्यांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच खराब कांदा बी देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया

संबंधित कांदा बी विक्रेत्याकडून मी ३५०० रुपये किलोप्रमाणे १५ किलो बियाणे खरेदी केले होते. साधारणपणे चार एकरांत कांदा पिकाची लागवड केली आहे. आजमितीस संपूर्ण कांदा पिकाला नळे निघाले आहेत. कांदा पिकाला रंगही एकसारखा नसल्याने माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
-सूर्यकिरण निकम, प्रगतशील शेतकरी, काटकरवाडी


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...