Agriculture news in Marathi The onion bought for ‘Nafed’ rotted in the chalice | Agrowon

‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच सडला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

मे महिन्यात कांद्याची शेतकऱ्यांकडून थेट बांधावर खरेदी केल्यानंतर खरेदीदारांनी तो शेतकऱ्यांच्या चाळीतच भाडेतत्त्वावर साठवला. मात्र तो वेळीच न उचलल्याचे टिकवणक्षमता धोक्यात आली. त्यामुळे ८० टक्के कांद्याचे नुकसान झाले.

नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या माध्यमातून राज्यात काही संस्था व शेतकरी उत्पादन कंपन्या यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाते. मे महिन्यात कांद्याची शेतकऱ्यांकडून थेट बांधावर खरेदी केल्यानंतर खरेदीदारांनी तो शेतकऱ्यांच्या चाळीतच भाडेतत्त्वावर साठवला. मात्र तो वेळीच न उचलल्याचे टिकवणक्षमता धोक्यात आली. त्यामुळे ८० टक्के कांद्याचे नुकसान झाले. मोठी दुर्गंधी पसरल्याने आरोग्य धोक्यात आल्याचा प्रकार सटाणा तालुक्यात समोर आला आहे. 

सटाणा तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी नारायण नथू गांगुर्डे यांच्याकडून सटाणा तालुक्यातील संस्थेने नाफेडची खरेदी असल्याचे सांगून ४०० क्विंटल कांदा मे महिन्यात खरेदी केला. त्यानंतर भाडेतत्त्वावर तुमच्या चाळीत ठेवा अशी विनंती केली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या कांद्याची सड होऊ लागल्यानंतर हा कांदा उचलून घ्या, याबाबत गांगुर्डे यांनी पाठपुरावा केला. मात्र खरेदीदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ऑक्टोबर महिन्यापासून सड गतीने होऊन ८० टक्के सड झाली. 

या बाबत समाज माध्यमातून चर्चा झाल्यानंतर हा कांदा उचलून नेला. मात्र नंतर चाळीत कुठलीही साफसफाई तर नाहीच शिवाय कांदा चाळ भाडे अदा न केल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. ‘नाफेड’च्या नावाचा वापर करून परवाने नसलेले घटक खरेदी करत असल्याची शंका उपस्थित झाली आहे. या प्रकारात ‘‘ना खरेदीची बिले दिली गेली, ना भाडे’’ अशी परिस्थिती आहे. असे असताना खरेदीदार शेतकऱ्यालाच दमबाजी करून व फौजदारी दाखल करण्याची धमकी देत असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले.

चाळी भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या. त्यामुळे खरेदी व साठवणूक केलेल्या कांद्याच्या प्रकरणात गैरप्रकार चव्हाट्यावर येत आहेत. नाफेडने याप्रश्‍नि सखोल चौकशी करावी.
- कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना


इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...