Agriculture news in Marathi Onion buying and selling closed at Parner Market Committee | Agrowon

पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार नऊ मेपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर बाजार समितीने तसे जाहीर केले आहे.

नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार नऊ मेपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर बाजार समितीने तसे जाहीर केले आहे.

नगर जिल्ह्यात, पारनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व राज्यात लॉकडाउन झाल्यानंतर बाजार समितीमधील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यानंतर पणन संचालनालयाने नियम व अटींचे पालन करून हे व्यवहार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बाजार समितीने एक मेपासून कांदा खरेदी-विक्री व्यवहार सुरू केले होते.
मात्र पारनेर शहरासह तालुक्‍यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, बाजार समितीत काम करणाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे व्यवहार करणे कठीण होत आहे. याचा विचार करून व्यापारी असोसिएशनच्या वतीने बैठक घेऊन, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नऊ मेपासून व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी, कामगार, मजूर, हमाल, व्यापारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय झाला असला, तरी लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येऊन खरेदी- विक्री सुरळीत सुरू होईल. बाजार समितीने कायम शेतकरी, कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. कोरोनामुळे आतापर्यंत नगर, घोडेगाव, पारनेर बाजार समित्यांत व्यवहार बंद आहे. कडक लॉकडाउन काळातही लोक बाहेर पडत असल्याने रुग्ण कमी होइनात त्यामुळे महापालिका आयुक्‍तांनी पुन्हा कडक लॉकडाउन लागू केला आहे.

जिल्ह्यात अजून पाच दिवस कडक लॉकडाउन
नगर शहर व जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. दररोज चार ते पाच हजार रुग्णसंख्येत भर पडत असल्याने महापालिकेने सात दिवसांचा कडक लॉकडाउन केला होता. त्यात आता पुन्हा पाच दिवसाची भर घालण्यात आली आहे. आता १५ मे पर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. भाजीपाला, फळे विक्रीला घाललेली बंदी कायम आहे. महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी सोमवारी (ता. १०) रात्री पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आला आहे.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...